बागलाण तालुक्यात युरीया खंताची कृत्रीम टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 06:03 PM2020-07-05T18:03:04+5:302020-07-05T18:07:15+5:30
औदाणे : बागलाण तालुक्यात युरीया खंताची कृत्रीम टंचाई निर्माण करु न शेतकऱ्यांना जादा दराने विक्र ी होत असल्याचा प्रकार होत असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह तालुका कृषी आधिकारी सुधाकर पवार यांच्या समवेत कृषी सेवा केंद्रांची पाहाणी केली. बागलाण तालुक्यात युरीया खतांची कृत्रीम टंचाई निर्माण करून शेतक ऱ्यांना जादा दराने विकण्याचा व्यवसाय करीत असल्याची तक्र ार शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे यांच्याकडे शेतकºयांनी केली होती.
लोकमत न्युज नेटवर्क
औदाणे : बागलाण तालुक्यात युरीया खंताची कृत्रीम टंचाई निर्माण करु न शेतकऱ्यांना जादा दराने विक्र ी होत असल्याचा प्रकार होत असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह तालुका कृषी आधिकारी सुधाकर पवार यांच्या समवेत कृषी सेवा केंद्रांची पाहाणी केली.
बागलाण तालुक्यात युरीया खतांची कृत्रीम टंचाई निर्माण करून शेतक ऱ्यांना जादा दराने विकण्याचा व्यवसाय करीत असल्याची तक्र ार शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे यांच्याकडे शेतकºयांनी केली होती.
यावेळी दोन डमी शेतकºयांना सदर कृषी केंद्रांवर युरीया विकत घेण्यासाठी पाठवले असता युरीया शिल्लक नसल्याचे सांगून परत पाठविण्यात आले. मात्र डॉ. सोनवणे यांनी तालुका कृषी अधिकाºयांना सोबत घेवून नामपुर, सटाणा केंद्रावर गेले असता काही ओळखीच्या शेतकºयांना १५/१७ गोणी युरीया दिल्याचे बिल बुकावरून निदर्शनास आले. सकाळी युरीया शिल्लक नसल्याचे सांगणाºया कृषी केंद्रांनी त्वरीत शेतकºयांना युरीया विक्र ी करण्यास सुरूवात केली. म्हणून अशा केंद्रांवर जे शेतकºयांचे शोषण करीत आहेत त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी कृषी अधीकाºयांकडे करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक अमोल पगार, धनंजय वाघ, प्रकाश सुर्यवंशी, समाधान अहिरे आदी उपस्थीत होते.