भरतपूर, शहा, पंचाळे, वडांगळी, खडांगळी, हिवरगाव, सोनारी, मनेगाव, दोडीसह सिन्नर शहरातील १५ कुटुंबे उपस्थित होती. कोपरगाव तालुक्यातील एका कुटुंबास मदत देण्यात आली. डॉ. प्रशांत शिंदे यांनी कोरोना आजाराविषयी मार्गदर्शन केले. डॉ. भाग्यश्री शिंदे यांनी उपस्थित कुटुंबांची आरोग्य तपासणी केली. इगतपुरी तालुक्याचे समन्वयक डॉ. दीपक कुमट यांचे सहकार्य लाभले. कांतीलाल राठोड यांनी सूत्रसंचालन केले. साहेबराव बोऱ्हाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अध्यक्ष प्रदीप शिंदे, सदस्य सचिन बोरसे, चंदन उगले, आर. एम. सानप, किरण गायकवाड, सुयोग गुरुळे, रवी वाणी, नितीन खैरनार, सोमनाथ वाकचौरे, राहुल आरने, रखमा लहामगे, सचिन गांगुर्डे, दीपक कुसळकर आदी उपस्थित होते.
चौकट-
‘त्या’ कुटुंबीयांचे समुपदेशन
कोरोनामुळे संकट ओढवलेल्या कुटुंबीयांना खचून न जाता पुढील आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. डॉ. संदीप शिंदे, रवींद्र कांगणे, रामनाथ म्हस्के यांनी त्यांच्याशी संवाद साधत धीर देण्याबरोबरच मनोबलदेखील वाढविले. साईकृपा सोशल क्षतिग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांना देण्यात आली.
फोटो - ०२ सिन्नर साईकृपा
सिन्नर येथे साईकृपा सोशल फाउंडेशनच्यावतीने कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या कुटुंब व विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली. यावेळी लाभार्थी कुटुंबासह फाउंडेशनचे पदाधिकारी.
020921\02nsk_31_02092021_13.jpg
फोटो - ०२ सिन्नर साईकृपा