कोरोना तपासणीसाठी गेलेल्या पथकावर कळवण तालुक्यात हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 01:42 AM2021-03-31T01:42:28+5:302021-03-31T01:43:32+5:30

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची अँटिजेंन चाचणी करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतलेला असला तरी तपासणीसाठी जात असलेल्या पथकाला रोषास सामोरे जावे लागत आहेत. जयदर व तिरहाळे येथे वैद्यकीय पथकावर दगडफेक करून पिटाळून लावले.

Attack on a team that went to investigate Corona in Kalvan taluka | कोरोना तपासणीसाठी गेलेल्या पथकावर कळवण तालुक्यात हल्ला

कोरोना तपासणीसाठी गेलेल्या पथकावर कळवण तालुक्यात हल्ला

Next

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची अँटिजेंन चाचणी करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतलेला असला तरी तपासणीसाठी जात असलेल्या पथकाला रोषास सामोरे जावे लागत आहेत. जयदर व तिरहाळे येथे वैद्यकीय पथकावर दगडफेक करून पिटाळून लावले. सक्ती केल्यास आरोग्य केंद्राचा पाणी पुरवठा तोडण्याचा इशारा देण्यात आला. जयदर येथे कोरोना रुग्ण सापडल्यामुळे पथक सोमवारी गावात वैद्यकिय तपासणीसाठी गेले होते.
पथकावर केली दगडफेक
रुग्णाच्या सानिध्यात आलेल्या लोकांची अँटिजेंन चाचणी करण्याचा प्रयत्न सुरू करताच काही लोकांनी एकत्र येत पथकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, काही दगड घेऊन पथकाच्या पाठीमागे धावले, ज्या ठिकाणी कंटेन्मेंट झोनचे फलक लावले ते देखील फाडून फेकण्यात आले. त्यामुळे वैद्यकीय पथक हवालदील झाले. या वेळी गावचे सरपंच व ग्रामसेवकाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धमकी देण्यात आली. परिणामी पथक माघारी फिरले. 
n असाच प्रकार तिरहाळे येथे देखील घडला. पथक गावात तपासणीसाठी आल्याचे कळताच गावातील लोकांनी एकत्र येत पथकाला घेराव घातला. आम्हाला काहीच झालेले नसताना चुकीच्या पद्धतीने कोरोना पॉझीटीव्ह दाखवतात असे सांगून गावातून निघून जा, अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वीज, पाणी पुरवठा तोडण्याचा इशारा दिल्याने पथक माघारी फिरले. 

Web Title: Attack on a team that went to investigate Corona in Kalvan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.