डॉक्टरांवरील हल्ले रोखणे आवश्यक : विश्वास-नांगरे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:16 AM2019-09-30T00:16:20+5:302019-09-30T00:18:26+5:30
समाजात डॉक्टरांप्रती उमटणारी हिंसक प्रतिक्रिया रोखण्यासाठी या डॉक्टर आणि पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून, त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील यांनी केले.
नाशिक : समाजात डॉक्टरांप्रती उमटणारी हिंसक प्रतिक्रिया रोखण्यासाठी या डॉक्टर आणि पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून, त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील यांनी केले.
नाशिक आॅबस्टेरिक्ट अॅण्ड गायनोलॉजिकल सोसायटीतर्फे रविवारी (दि.२९) एक दिवशीय परिषदेत ‘मेडिको लीगल असपेक्ट ओबेजी’अर्थात ‘आरोग्य यंत्रणा आणि कायदेशीर तरतुदी’ विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. नलिनी बागुल यांच्यासह सचिव डॉ. उमेश मराठे, खजिनदार डॉ. निवेदिता पवार, डॉ. अश्विनी पेखळे, डॉ. वर्षा लहाडे, फॉग्सीच्या मेडिको लिगल कमिटीचे डॉ. गीतेंद्र शर्मा, डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर, डॉ. शोधन गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नांगरे-पाटील म्हणाले, सुरक्षेसाठी डॉक्टरांनी पोलिसांच्या सूचना अंमलात आणल्या पाहिजेत. तत्पूर्वी पहिल्या सत्रात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन, गर्भपातासंदर्भातील कायदा, रुग्ण सेवेसंदर्भातील कायदेशीर परवानग्या व कायदेशीर तरतुदीविषयी मार्गदर्शन केले. सरोगसी पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या मातृत्वाच्या कायदेशीर समस्यांविषयी डॉ. मंजिरी वालसनकर यांनी मार्गदर्शन केले. अॅड. संतोष डांगरे, न्यायमूर्ती डॉ. संतोष काकडे, डॉ. किरण कुर्तकोटी, डॉ. मनीष माचवे, हितेश भट, डॉ. संजय अपरांती यांनी विविध विषयावर केले. दरम्यान, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी माध्यमे व वैद्यकीय व्यवसायातील परस्पर संबंधांविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. रविराज खैरनार, डॉ. गौरी करंदीकर यांनी केले. डॉ.उमेश मराठे यांनी आभार मानले.
अनेकदा रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईक यांच्याकडून डॉक्टरावर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारणाची दखल घेऊन डॉक्टरांची भूमिका निश्चित करण्यासाठी व कायदेशीर पाठपुराव्यासाठी मेडिको लीगल कमिटी या विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत डॉ. निवेदिता पवार, डॉ. अभय सुखात्मे आणि डॉ. शोधन गोंदकर याचा समावेश आहे.