कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न : मिनिटांत २०० लोकांचे थर्मल स्कॅनिंग करणारा ‘स्मार्ट हेल्मेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 06:36 PM2020-09-05T18:36:59+5:302020-09-05T18:40:48+5:30

यावेळी काही नागरिकांचे तापमान शंभराच्या आसपास असल्याचीही नोंद झाली. त्यावेळी त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक आदी माहिती लिहून घेण्यात आली.

Attempts to prevent corona: 'Smart helmets' that thermally scan 200 people per minute | कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न : मिनिटांत २०० लोकांचे थर्मल स्कॅनिंग करणारा ‘स्मार्ट हेल्मेट’

कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न : मिनिटांत २०० लोकांचे थर्मल स्कॅनिंग करणारा ‘स्मार्ट हेल्मेट’

Next
ठळक मुद्दे शहरातील रुग्णांचा आकडा २८ हजार ५६१स्मार्ट हेल्मेटद्वारे नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग ‘मिशन झिरो नाशिक’ अभियान

नाशिक : शहरात कोरोनाच्या आलेखाबरोबरच सार्वजनिक ठिकाणांवरील नागरिकांची गर्दीदेखील वाढत आहे. शहरातील कोरोनाला आळा घालण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने आणखी एक पाऊल पुढे टाकत गर्दीच्या ठिकाणी आधुनिक अशा स्मार्ट हेल्मेटद्वारे नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. या हेल्मेटच्या माध्यमातून एका मिनिटात २०० तर तासाभरात १२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची स्कॅनिंग होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोना संशयित रु ग्णाला शोधून कोरोना संसर्गाच्या फैलावाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास भारतीय जैन संघटनेने व्यक्त केला आहे.
मागील महिनाभरापासून भारतीय जैन संघटना, महापालिका तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने ‘मिशन झिरो नाशिक’ अभियान संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राबविले जात आहे. या अभियानांतर्गत आधुनिक अशा स्मार्ट हेल्मेटद्वारे नागरिकांची थर्मल तपासणीची सुरुवात शनिवारी (दि. ५) कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी या स्मार्ट हेल्मेटच्या माध्यमातून संघटनेच्या स्वयंसेवकांनी पीपीई सूट घालून बाजार समितीच्या आवारात फेरफटका मारत तेथील विक्रेते, ग्राहकांना स्कॅन केले. याद्वारे प्रत्येकाच्या शरीराच्या तापमानाची नोेंद करण्यात आली. दरम्यान, यावेळी काही नागरिकांचे तापमान शंभराच्या आसपास असल्याचीही नोंद झाली. त्यावेळी त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक आदी माहिती लिहून घेण्यात आली. या हेल्मेटमुळे दिवसभरात सुमारे एक लाखापेक्षा अधिक नागरिकांचे स्कॅनिंग करणे शक्य होणार असल्याचे संघटनेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला यांनी सांगितले. शहरातील रुग्णांचा आकडा २८ हजार ५६१, तर जिल्ह्याचा आकडा शुक्रवारी ४१ हजार ५६५ इतका झाला होता. आतापर्यंत ९११ रुग्णांना उपचारादरम्यान आपले प्राण गमवावे लागले आहे.

Web Title: Attempts to prevent corona: 'Smart helmets' that thermally scan 200 people per minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.