पाणी, चाऱ्याची उपलब्धता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:26 PM2020-01-15T22:26:54+5:302020-01-16T00:34:48+5:30
सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसलेल्या काटवन परिसरात यंदा चांगल्या पर्जन्यमानामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. विराणे धरणही यावर्षी भरले. यामुळे परिसरातील शेतीबरोबरच गुराढोरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. डिसेंबर महिन्यात कोरडेठाक होणारे विराणे धरणात पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे परिसरातील पशुपक्षी व गुराढोरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
वडनेर : सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसलेल्या काटवन परिसरात यंदा चांगल्या पर्जन्यमानामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. विराणे धरणही यावर्षी भरले. यामुळे परिसरातील शेतीबरोबरच गुराढोरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. डिसेंबर महिन्यात कोरडेठाक होणारे विराणे धरणात पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे परिसरातील पशुपक्षी व गुराढोरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
कायमच दुष्काळाच्या छत्रछायेखाली असणारा परिसर आता समाधानकारक पावसाने हिरवागार होण्यास सुरुवात झाली आहे. परिसरातील काही ओढे-नाले अद्यापही वाहत आहेत. यामुळे पक्ष्यांच्या चिवचिवाट ऐकू येत आहे. धरणांमध्ये पांढºया शुभ्र बदकांचा थवा दिसून येत आहे. यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट टळणार अशी आशा सर्वांनाच आहे. याचाच परिणाम म्हणून दूध व्यवसायाला अच्छे दिन येण्याची आशा आता या परिसरातील जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाºया शेतकऱ्यांना आहे. सातत्याच्या दुष्काळामुळे
कटवन परिसरात कायमच चारांचाईचा सामना करावा लागतो. परंतु यंदा काहीअंशी हा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. काटवन परिसराला गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत होते. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. मेंढपाळांना स्थलांतराची वेळ आली होती.