आंबे दिंडोरी ते मोहाडी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 04:03 PM2020-10-21T16:03:34+5:302020-10-21T16:07:15+5:30

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्ता दूरुस्ती च्या प्रतिक्षेत.सदर रस्त्यावर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्त्याचा अक्षरशः रस्त्याचा फज्जा उडाला आहे.ठिक-ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. सदर रस्त्यावर वाहन चालवितांना चालकाचा तोल जावून अपघात होत आहे.दिंंडोरी पंचायत समितीच्या संबंधीत दळणवळण विभागाने तात्काळ दिलेल्या निवेदनाची दखल घेवून या रस्त्याची दूरुस्ती करावी, अशी मागणी रिपाइंचे युवा तालुकाध्यक्ष सागर गायकवाड व शेतकरी सुभाष.पी.वाघ,संदिप कड,गणेश कुंभार, सौरभ गायकवाड, गणेश गांगुर्डे यांनी निवेदना द्वारे मागणी केली आहे.

Awaiting repair of Ambe Dindori to Mohadi road | आंबे दिंडोरी ते मोहाडी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्त्याची झालेली दैनिय अवस्था.तर रस्त्याच्या कडेला असलेली झाडे-झुडपांच्या आड लपलेला रस्ता.

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा व सर्व पक्षीयच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्ता दूरुस्ती च्या प्रतिक्षेत.सदर रस्त्यावर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्त्याचा अक्षरशः रस्त्याचा फज्जा उडाला आहे.ठिक-ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. सदर रस्त्यावर वाहन चालवितांना चालकाचा तोल जावून अपघात होत आहे.दिंंडोरी पंचायत समितीच्या संबंधीत दळणवळण विभागाने तात्काळ दिलेल्या निवेदनाची दखल घेवून या रस्त्याची दूरुस्ती करावी, अशी मागणी रिपाइंचे युवा तालुकाध्यक्ष सागर गायकवाड व शेतकरी सुभाष.पी.वाघ,संदिप कड,गणेश कुंभार, सौरभ गायकवाड, गणेश गांगुर्डे यांनी निवेदना द्वारे मागणी केली आहे. सदर रस्ता हा इ.जि.मा.क्र १९७ व ग्रामीण मार्ग १८ हा दहा ते बारा वर्षा पासून नादुरुस्त आहे. या रस्त्यावर एवढ्या वर्षात कधी डागडुजी करण्यात आली नाही. या रस्त्याकडे दिंडोरी पंचायत समितीच्या दळणवळन विभागाने कायमच कानाडोळा केला आहे. सदर रस्त्यावर म्हसरूळ मार्गे मोहाडि शहर बस (सीटि बस)सेवा सुरू आहे. ही शहर बस सेवा दिवसातून बारा फेऱ्या करते. तसेच मोहाडी येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून वरवंडी,शिवनई,आंबेदिंडोरी व गणोरवाडि येथील विद्यार्थ्यांना सदर रस्त्याने शिक्षणासाठी दररोज ये-जा करावी लागते परंतु सदर रस्ता बिनकामी झाल्याने शहर बस सेवा कोरोना महामारी येण्याअगोदर पासून म्हणजे जानेवारी२०१९ पासून नियमितपणे शहर बससेवेच्या फेऱ्या रद्द झालेले आहे.शहर बस सेवा बंद असली की या मार्गावरील विद्यार्थ्यांना दहा-पंधरा किलोमीटर ची पायपीट करीत घरचा रस्ता गाठावा लागतो.यावर लोकप्रतिनिधी ना लाज कशी वाटत नाही.मत मागण्याच्या वेळेस जनतेकडे येता मग मतांची भीक मागायला आता कुठं ठेवली.लोकप्रतिनिधींनी लाज-लज्जा यापुढे जाऊन सदर रस्ता हा खेडगाव,बोपेगाव,जऊळके-वणी, मातेरेवाडी,लोखंडेवाडी,जोपुळ,खडक-सुकेना,कुर्नोली, कोराटे,मोहाडी अशा अनेक गावांना नाशिक येथील मुख्य बाजारपेठेला भाजीपाला घेऊन जाण्याचा जवळचा मार्ग आहे. सदरचा रस्ता हा सोयीस्कर असल्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात राहाते प्रवाशांना नाशिकला जाण्याचा जवळचा मार्ग आहे. व याच मार्गाने प्रवासी व शेतकरी जाण्यास पसंत करतात.सदर रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूकडिल कडेला झाडे-झूडपांणी दुतर्फा दाटि झाल्याने वाहन चालकांना झाडा-झुडपांंच्या आड असलेल्या वाहानांचा अंदाज येत नाहि.तर खड्डे वाचविण्याच्या विवंचणेत वाहन चालक असल्याने वाहानावरचे नियंत्रण सुटल्याने मोठ-मोठे अपघात होतात.या रस्त्यावर दिवसेंदिवस लहान मोठे अपघातांचे प्रमाण वाढतच चाले आहे.यातून एखाद्याचा जीव गमवावा लागतो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने तात्काळ रस्त्याची दूरुस्ती करावी, अन्यथा दूरुस्ती न झाल्यास पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या व सर्व पक्षीय वतीने आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला.

सदर रस्ता हा मार्च २०१७ मंजूर झाला होता , परंतू विधान परिषदेचे उपाध्यक्ष आमदार नरहरि झिरवाळ यांनी रद्द केला.
- सारिका नेहरे. जि. प. सदस्या.

सदर रस्त्या बाबत आमच्या विभागाचे शाखा अभियंता यांना तात्पुरत्या उपायोजना करण्याचे आदेश दिले आहे.व वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आले आहे.
- किरण पवार, इ.व.द उप अभियंता दिंडोरी.

ठळक मुद्दे
*शेतकऱ्यांचा व सर्व पक्षीय यांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा ईशारा.
*वाहन चालकांचे नियत्रण सुटल्याने मोठे मोठे अपघात होतात.
*विधान परिषदेचे उपाध्यक्ष मा.आमदार नरहरि झिरवाळ यांनी रद्द केला.

 

 

Web Title: Awaiting repair of Ambe Dindori to Mohadi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.