जिल्ह्यात रामनामाचा जागर, मिठाईचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 01:34 PM2020-08-05T13:34:01+5:302020-08-05T13:34:35+5:30
सिन्नर : राममंदीर भूमिूपजन सोहळ्यानंतर जिल्ह्यात रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून ठिकठिकाणी रामनामाचा जागर करण्यात आला असून मिठाईचे वाटप करत आनंद द्विगुणित करण्यात आला.
सिन्नर : राममंदीर भूमिूपजन सोहळ्यानंतर जिल्ह्यात रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून ठिकठिकाणी रामनामाचा जागर करण्यात आला असून मिठाईचे वाटप करत आनंद द्विगुणित करण्यात आला.
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव ग्रामस्थांच्यावतीने राममंदीरात अभिषेक करु न आंनदोत्सव साजरा करण्यात आला . राममंदीरात सकाळी अकरा वाजता अंकूर काळे व रेणूका काळे यांच्या हस्ते अभिषेक करु न पादूका पुजन करु न आरती करण्यात आली .यावेळी बबन काकड,अर्जुन आव्हाड, रामदास भोर, यज्ञेश काळे, प्रमोद शिंदे , नितिन पाटोळे, आक्षय भारती, विलास वाघ,दिलीप शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. देवळा तालुक्यातील गुंजाळ नगर येथे श्रीराममंदीरात रामभक्तांनी पुजा पाठ कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी ह.भ. प. संजय धोंडगे, भाजपा दिपक जाधव, राजेंद्र गुंजाळ, माजी उपसरपंच सतीश गुंजाळ, माजी पोलिस पाटील हिरामण गांगुर्डे,पोलीस पाटील योगेश गुंजाळ,बाळासाहेब गुंजाळ,चिंतामण गुंजाळ,ग्रामसेवक वैभव निकम,पप्पू गुंजाळ,दीपक पान पाटील,आदी ग्रामस्थ उपस्थित होते. नांदगाव शहरातील भगवान महावीर मार्गावरील राम मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले. कळसावर नवीन ध्वज लावण्यात आला. पहाटे विशेष महापूजा व हनुमान चालीसचे पठन करण्यात आले. रामाची आरती करण्यात आली. पेढे वाटप करण्यात आले. शहरातील उघडा मारु ती, मल्हारवाडी येथील मारु ती मंदिरात सजावट करून विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांना भा. दं. वि.१४८ प्रमाणे जमावबंदी आदेश उल्लंघन करू नये अशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. भाजपचे दत्तराज छाजेड, द्वारकानाथ कलंत्री, प्रशांत खैरनार, विकास शर्मा, डॉ. श्रीकांत देवरे, उमेश मोकळ, साहेबराव खैरनार, बाल गोपाळ मंडळी उपस्थित होते.