मालेगाव : येथील दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये कोरोना विषाणु विषयी जनजागृती व उपाययोजना कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना कोरोना विषाणुबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांची भीती घालविण्यात आली. यानंतर मुख्याध्यापक गणेश शिंदे यांनी मनातील भीती नाहीशी करुन प्रतिबंधात्मक उपाय, आजाराची लक्षणे व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. शिक्षिका नम्रता निकम यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. उपमुख्याध्यापक केतन सूर्यवंशी यांनी कोरोना प्रसार व परिणाम यांची माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष देविदास बच्छाव, कोषाध्यक्ष कमल बच्छाव, सचिव सचिन बच्छाव, उपाध्यक्ष पूनम बच्छाव, प्राचार्य गणेश शिंदे, उपप्राचार्य केतन सूर्यवंशी यांच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इंटरनॅशनल स्कुलमध्ये कोरोना विषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 4:08 PM