शहरात टिळक, साठे यांच्या कार्याचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:05 AM2020-08-02T00:05:05+5:302020-08-02T01:23:34+5:30

नाशिक : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रतिमांचे पूजन करण्यात आले. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन स्पर्धा घेतल्या.

Awareness of the work of Tilak and Sathe in the city | शहरात टिळक, साठे यांच्या कार्याचा जागर

शहरात टिळक, साठे यांच्या कार्याचा जागर

Next
ठळक मुद्देसंस्था-संघटनांतर्फे कार्यक्रमाचे आयोजन । शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रतिमापूजन; फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रतिमांचे पूजन करण्यात आले. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन स्पर्धा घेतल्या.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे उपस्थित होते.
इंदिरानगर : वडाळागाव येथील सावित्रीबाई फुले मित्रमंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी दशरथ गायकवाड, ईश्वर पवार, सुनील उन्हाळे, अनिल उन्हाळे, अनिकेत घोडे, संतोष गायकवाड, दीपक गायकवाड, संदीप गायकवाड, दिलीप गायकवाड, गजानन लाखे, समाधान गवई आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब हिरे विद्यालय
गंगापूररोडवरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच कार्यक्र म घेण्यात आला. मुख्याध्यापक जयवंत बोढारे, पर्यवेक्षक रमेश बागुल यांनी लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्र मप्रसंगी उपशिक्षक महेंद्र देवरे, प्रमोद पाटील, संजीव डामरे, सुनील चौधरी, कमलेश आहिरे, प्रशांत सोनवणे, संजय शेळके उपस्थित होते.

Web Title: Awareness of the work of Tilak and Sathe in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.