शिरवाडे वणी : अवकाळी पाऊस, गारपीट, फयान रोगामुळे रोगग्रस्त झालेल्या द्राक्षबागा नुकसानग्रस्त झाल्याने द्राक्ष बागांवर संतप्त उत्पादकांनी कुऱ्हाडीचे घाव घातले.
निफाड तालुका द्राक्ष उत्पादनात अग्रेसर मानला जात असून, द्राक्षाच्या प्रगत शेतीमुळे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया समजला जात होता. द्राक्षाचे पीक हे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जात होते. तसेच परकीय चलन मिळवून देणारे एकमेव पीक मानले जात असत.
मागील चाळीस वर्षांच्या कालखंडाकडे दृष्टिक्षेप टाकला असता द्राक्ष वेलींची वयोमर्यादा किमान पंचवीस ते तीस वर्षापर्यंत राहात होती .परंतु नवनवीन तंत्रज्ञानानुसार द्राक्षांच्या वेगवेगळ्या जाती द्राक्ष उत्पादकांना दिवसेंदिवस मोहात पाडत आहेत व प्रति पाच वर्षांनंतर बाजारात द्राक्षाच्या विविध वाणांची लागवड करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना अपेक्षा पोटी थोड्या कालावधीतच द्राक्ष बागा काढून त्या ठिकाणी नवीन द्राक्ष बागेची लागवड करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून द्राक्ष वेलींना अवकाळी पावसाचे व गारपीट फयान वादळी वारे यांचा फटका बसत आहे.रोगांचा प्रादुर्भावविविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे परिणामी रोगामुळे द्राक्ष वेली मजबूत होण्याऐवजी कमकुवत होत चालल्या आहेत. त्यामुळे वीस वर्षांपर्यंत वयोमर्यादा असलेल्या द्राक्ष बागेला आता सात ते आठ वर्षांनंतरच कुर्हाडीचे घाव सोसण्यास तयार व्हावे लागत आहे. मागील दोन वर्षात पावसाळी वातावरणात छाटलेल्या द्राक्ष बागांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे औषधांच्या अनाठाई वापरामुळे निकृष्ट दर्जाच्या होऊन गेल्या.बागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणीद्राक्ष बागा वाचविण्यासाठी भरमसाठ औषधांचा खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्यामुळे द्राक्ष वेलींवर रोगांचे प्रमाण वाढून अशक्त झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अशा द्राक्ष वेलींवर कुऱ्हाड घालण्याची वेळ आली आहे. एकावेळी लावलेली द्राक्ष बाग किमान वीस वर्ष टिकण्यायोग्य असताना पाच ते सात वर्षात द्राक्षवेली समूळ काढून नवीन द्राक्ष बाग तयार करण्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागत आहे.उत्पादन कमी अन् खर्चात वाढनवीन द्राक्ष बागेपासून उत्पादन घेण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागत असून, खर्चही मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. परंतु अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे रोगग्रस्त झालेल्या द्राक्ष बागांपासून मिळणारे उत्पादन कमी मिळत असून, खर्च तेवढाच करावा लागत असल्यामुळे खर्च वजा जाता शिल्लक पुरेपूर होत नसल्यामुळे नाईलाजास्तव अशा द्राक्षबागा समूळ नष्ट करून नवीन लागवड करणेच योग्य असल्याचे द्राक्ष उत्पादकांकडून ऐकावयास मिळत आहे.(०१ शिरवाडे वणी)