हरभयाचा दाणा घशात अडकल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:19 AM2018-02-17T02:19:52+5:302018-02-17T02:20:07+5:30

घरात खेळताना तोंडात टाकलेला हरभºयाचा दाणा घशात अडकल्याने एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि़१६) सकाळी सिडकोतील हनुमान चौकात घडली. सुजय जयेश बिजुटकर (१) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे़ सहा महिन्यांपूर्वी याच परिसरातील वीर जयस्वाल या चिमुकल्याच्या घशात खेळण्याचा फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

The baby's death by trapping the gram of gram in the throat | हरभयाचा दाणा घशात अडकल्याने बालकाचा मृत्यू

हरभयाचा दाणा घशात अडकल्याने बालकाचा मृत्यू

Next

सिडको : घरात खेळताना तोंडात टाकलेला हरभºयाचा दाणा घशात अडकल्याने एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि़१६) सकाळी सिडकोतील हनुमान चौकात घडली. सुजय जयेश बिजुटकर (१) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे़ सहा महिन्यांपूर्वी याच परिसरातील वीर जयस्वाल या चिमुकल्याच्या घशात खेळण्याचा फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील रहिवासी सुजया बिजुटकर या आपला एक वर्षीय मुलगा सुजयसह आईसोबत राहतात़ शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सुजय हा घरात खेळत असताना त्याने हरभºयाचा दाणा तोंडात टाकला़ यामुळे त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यास तत्काळ जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले़ या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यास घरी पाठविण्यात आले होते़ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सुजया या कामावर जाण्यासाठी निघाल्या असता मुलगा सुजय यास उठविण्यासाठी गेल्यावर त्याची हालचाल दिसून न आल्याने त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़  दरम्यान, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच बुधवारी (दि़१४) बिजुटकर कुटुंबीयांनी सुजयचा वाढदिवस साजरा केला होता़ या वाढदिवसाच्या आनंदाचे क्षण डोळ्यासमोर असतानाच अचानक ही घटना घडल्याने कुटुंबीयांच्या दु:खाला पारावार राहिला नाही़ दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  वर्षभरातील तिसरी दुर्दैवी घटना़़़
सिडकोतील हनुमान चौकातील वीर विनोद जयस्वाल या आठ महिन्यांच्या मुलाच्या घशात फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सहा महिन्यांपूर्वी घडली होती़, तर ५ फेब्रुवारी रोजी नाशिकरोडजवळील चांदगिरी येथील चार वर्षीय शालिनी दत्तात्रय हांडगे या चिमुकलीचा दहा रुपयांचे नाणे गिळल्याने मृत्यू झाला़ या घटनेस बारा दिवसांचा कालावधी होत नाही तोच हरभºयाचा दाणा अन्ननलिकेत अडकल्याने सुजय बिजुटकर या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, पैसे वा फुगे देताना पालकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे़

Web Title: The baby's death by trapping the gram of gram in the throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू