वणी ते मुळाणे या खड्डेमय रस्त्यामुळे शेतकरी व प्रवाशांची गैरसोय होत असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिसरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हा रस्ता तीन तालुक्यांच्या सीमेला जोडणारा रस्ता म्हणून याकडे पाहिले जाते. चांदवड-कळवण या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून, छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात नेण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे कामकाज तातडीने करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश गायकवाड, ग्रामस्थ बाळासाहेब गायकवाड, राजू काकड, ज्ञानेश्वर गायकवाड, किरण कुवर, शामराव ढोमसे, केशव भोये, सुखदेव गायकवाड, देवराम पालवी, भाऊराव ढोमसे आदींनी केली आहे.
-----------------
दिडोरी तालुक्यातील वणी ते मुळाणे रस्त्याची झालेली दुरवस्था. (१९ वरखेडा).
===Photopath===
190521\19nsk_11_19052021_13.jpg
===Caption===
१९ वरखेडा