नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या घटकांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी उत्कृष्ट तालुका आणि ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांक बागलाण तालुक्याने मिळविला, द्वितीय क्रमांक देवळा, तर तृतीय क्रमांक त्र्यंबकेश्वर तालुक्याने मिळविला. सर्वोत्कृष्ट क्लस्टर (आवास योजना) गिरणारे क्लस्टर तालुका नाशिक (प्रथम), साकोरे क्लस्टर तालुका नांदगाव (द्वितीय), क्लस्टर वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर ( तृतीय),
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत (आवास योजना) दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत देवपाडा (प्रथम), मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचवे (द्वितीय), बागलाण तालुक्यातील शेवरे ग्रामपंचायत (तृतीय),
आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट वित्तसंस्थेचा पुरस्कार येवला तालुक्यातील जनता नागरी सहकारी बँकेने मिळविला आहे. द्वितीय क्रमांक बागलाण तालुक्यातील बँक ऑफ बडोदा, सटाणा शाखा तर तृतीय क्रमांक आडीबीआय बँक, सटाणा यांनी मिळविला. राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट तालुके (आवास योजना) पुरस्कार सिन्नर, नांदगाव आणि मालेगाव या तालुक्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय अणि तृतीय क्रमांक मिळविला.
सर्वोत्कृष्ट क्लस्टर (आवास योजना) प्रथम क्रमांक येवला तालुक्यातील क्लस्टर राजापूर, व्दितीय क्रमांक इगतपुरी तालुक्यातील क्लस्टर नांदगाव सदो, तृतीय क्रमांक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील क्लस्टर अंजनेरी यांनी पुरस्कार मिळविला.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत (आवास योजना) पुरस्कार प्रथम क्रमांक बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायत जामोठी, द्वितीय क्रमांक येवला तालुक्यातील ग्रामपंचायत अंगुळगाव, तृतीय क्रमांक इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत बोर्ली यांनी मिळविला.
आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट वित्तसंस्था म्हणून बागलाण तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया सटाणा, नाशिकमधील गुरुकृपा महिला स्वयंसहाय्यता, नाशिक समूह साडगाव,
आणि येवला तालुक्यातील बँक ऑफ बडोदा शाखा पाटोदा यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला,
जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख नाशिक : "स्वामित्व " योजनेंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करून तयार करण्यात आलेल्या मिळकत पत्रिकेचे वाटप शिवाजी तुपे, योगेश तुपे, रामदास डावरे, आनंद तुपे, राजूबाई सयाजी तुपे, सरपंच ग्रामपंचायत कार्यालय बेलू या लाभार्थींना करण्यात आले.