भगूर, देवळाली कॅम्पचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 06:06 PM2019-06-26T18:06:56+5:302019-06-26T18:07:22+5:30

जून महिना सुरू होऊनही यावर्षी पाऊस लांबणीवर पडला असून, त्यामुळे दारणा नदीपात्राची पाणी पातळी संपली आहे. देवळाली छावनी परिषदेच्या नागरी आणि लष्करी भागाला दारणा नदीपात्रालगतच्या पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा केला जातो.

Bandhur, Bhagora, Devlali Camp water supply | भगूर, देवळाली कॅम्पचा पाणीपुरवठा बंद

भगूर, देवळाली कॅम्पचा पाणीपुरवठा बंद

Next
ठळक मुद्देगंभीर संकट : दारणातून आवर्तन सोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भगूर : भगूर व देवळाली कॅम्प शहराला पाणीपुरवठा करणारी दारणा नदी आटल्याने भगूर आणि देवळाली कॅम्प शहराचा पाणीपुरवठा बंद झाला असून, दारणा धरणातून आवर्तन लवकर न सोडल्यास पाणी समस्या गंभीर होऊन आगामी काळात पाणीटंचाईचे संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन भगूर मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, नगराध्यक्ष अनिता करंजकर यांनी केले आहे.


जून महिना सुरू होऊनही यावर्षी पाऊस लांबणीवर पडला असून, त्यामुळे दारणा नदीपात्राची पाणी पातळी संपली आहे. देवळाली छावनी परिषदेच्या नागरी आणि लष्करी भागाला दारणा नदीपात्रालगतच्या पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी कार्यान्वित असलेल्या इंटेक वेलचे एक स्टेनर पाणी पातळी घटल्याने उघडे पडले आहे. दुसऱ्या स्टेनरमधून पाणी साठा उपलब्ध नाही. जर दुसºया स्टेनरला पुरेसा पाणी साठा नसल्यास पात्रात चर खोदून पाण्याचा प्रवाह स्टेनरपर्यंत नेण्याची कसरत करावी लागू शकते. दारणा पात्रातील पाणी साठा संपुष्टात आल्याने देवळाली कॅम्पला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तशीच परिस्थिती भगूरकरांची झाली आहे. दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास अथवा दारणा धरणातून आवर्तन दिल्यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल. अन्यथा पाणीटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करू शकते. भगूर व छावणी परिषद प्रशासनाकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तरीही जनतेने पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करावा. पाणी वाया घालवू नये. पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, तसे करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यास भगूरकरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन भगूर नगरपालिकेतर्फे केले जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

Web Title: Bandhur, Bhagora, Devlali Camp water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.