वाईन शॉपमधून ऑनलाइन मद्य देण्यास बार मालकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 04:04 PM2020-05-13T16:04:50+5:302020-05-13T16:07:32+5:30

लॉकडाऊन काळात मुळातच मद्य दुकानांना परवानगी देण्यात आली असून ती जीवनावश्यक बाब आहे का यावर बराच खल होत आहे. त्यानंतरही शासनाने महसुल वाढविण्यासाठी मद्य दुकानांना परवानगी दिली.

Bar owners oppose giving wine online from wine shops | वाईन शॉपमधून ऑनलाइन मद्य देण्यास बार मालकांचा विरोध

वाईन शॉपमधून ऑनलाइन मद्य देण्यास बार मालकांचा विरोध

googlenewsNext
ठळक मुद्दे हॉटेल आणि बार अशी एकत्रीत नोंदणीवाईन शॉपपेक्षा पाच टक्के अतिरीक्त व्हॅट देतात

नाशिक :  मद्य दुकानातील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणीनुसार घरपोच
मद्य सेवा देण्यासाठी शासन सरसावले असले तरी नाशिकमधील आभार या बार आणि
परमीट रूम संस्थेच्या वतीने मात्र विरोध केला आहे. वाईन शॉपचालकांना
यासंदर्भात झुकते माप दिले जात असल्याची तक्रार आहे. त्याऐवजी बंद
स्थितीत असलेल्या परमीट रूम आणि बार चालकांना हे काम दिल्यास त्यांचे
नुकसान टळू शकेल असे मत आभारचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी व्यक्त केले
आहे.
लॉकडाऊन काळात मुळातच मद्य दुकानांना परवानगी देण्यात आली असून ती
जीवनावश्यक बाब आहे का यावर बराच खल होत आहे. त्यानंतरही शासनाने महसुल
वाढविण्यासाठी मद्य दुकानांना परवानगी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून
दुकाने बंद असल्याने शासनाने हा निर्णय घेताच मद्य दुकानांवर गर्दी
उसळली. ती टाळण्यासाठी टोकन आणि अन्य व्यवस्था करण्यात आल्या असल्या तरी
आता ज्यांच्याकडे मद्य सेवनाचा परवाना आहे, त्यांनाच ऑनलाईन मद्य मागवता
येणार आहे. तथापि, ही सुविधा फक्त वाईन शॉपकिपरसाठीच आहे. गेल्या दोन
महिन्याांपासून बार आणि परमीट रूम बंद आहेत. त्यामुळे हॉटेल आणि बार असा
एकत्रीत व्यवसाय करणा-यांना आज त्यांच्याकडील वेटर आणि अन्य स्टाफ
सांभाळावा लागत आहे. बार बंद असल्याने हा सर्व सोसावा लागत असल्याने बार
चालक आर्थिक नुकसान सोसत आहेत. शासनाने वाईन शॉप प्रमाणे बार उघडू दिले
नसले तरी किमान ऑनलाईन विक्रीमध्ये बार चालकांचा समावेश करण्याची गरज
आहे, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.
राज्यात १६ हजाराहून अधिक परमीट रूम आणि बार आहेत. तर वाईन शॉप १६४५
आहेत. शॉपमध्ये केवळ एक ते दोन कर्मचारीच असतात. तर बार मध्ये अनेक
कर्मचारी कामास आहेत. आज आॅनलाईन मद्य दुकानदारांनी द्यायचे ठरवले तरी
त्यांच्याकडे कर्मचारीच नाहीत. या उलट परमीट रूम आणि बार चालकांना हे काम
दिल्यास त्यांच्याकडे पुरेसा स्टाफ आहे. याशिवाय हॉटेल आणि बार अशी
एकत्रीत नोंदणी असल्याने झोमॅटो, स्विगी सारख्या घरपोच खाद्य सेवा पुरवणा-यांशी करार केले आहेत. त्यामुळे शॉप पेक्षा बार चालक ही सेवा सहज देऊ शकतील, असे चव्हाण यांनी सांगितले.


परमीट रूम आणि बार चालक हे वाईन शॉपपेक्षा पाच टक्के अतिरीक्त व्हॅट
देतात. आज बार चालकांना त्यांच्याकडील कर्मचारी वर्ग सांभाळणे अत्यंत
कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने ऑनलाईन बार सेवा ही त्यांच्या
माध्यमातूनच देण्याची गरज आहे. यासंदर्भात राज्य स्तरावर संघटनेने
शासनाला पत्र पाठविले आहे.
- संजय चव्हाण, अध्यक्ष

Web Title: Bar owners oppose giving wine online from wine shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.