कारवाईत अडथळा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 01:34 AM2018-03-31T01:34:14+5:302018-03-31T01:34:14+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. ३०) नाशिक पूर्व विभागातील अशोका मार्ग, नारायणनगर येथील रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली.
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. ३०) नाशिक पूर्व विभागातील अशोका मार्ग, नारायणनगर येथील रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली. संबंधित व्यावसायिकांचा माल जप्त करण्यात आला. याचवेळी, अतिक्रमणविरोधी कारवाईत अडथळा आणणाºया चौघा व्यावसायिकांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेने गेल्या महिनाभरापासून रस्त्यावर बसणाºया हॉकर्स, भाजी विक्रेते व व्यावसायिक यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे. शुक्रवारी (दि. ३०) नाशिक पूर्व विभागातील अशोका मार्ग, नारायणनगर येथील रस्त्याच्या दुतर्फा बसणाºया व्यावसायिकांना हटविण्यात आले. यावेळी संदीप मिसाळ, विकी कुमावत, धर्मा आल्हाट व पप्पू अग्रवाल या व्यावसायिकांनी सरकारी कामात अडथळा आणल्याने त्यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़