सायखेडा : बेरवाडी गावाच्या लगत असलेला कडवा पाटावरील पूल काल सायंकाळच्या वेळी अचानक कोसळल्याने बेरवाडी शिवार, भेंडाळी, तळवाडे, महाजनपुर या गावांचा संपर्क तुटला आहे. बेरवाडी येथून गावकुसा लगत कडवा पाट पाण्याने भरून वाहत आहे जवळपास वीस वर्षे जुना झालेला पूल अनेक दिवसांपासून मोडकळीला आला होता पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी सतत ये जा करत असतांना कमकुवत पूल पाहून देखील डोळेझाक केल्याने अचानक पूल कोसळून वाहतूक बंद करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, अन्यथा रात्री अपरात्री पूल कोसळला असता तर सावित्री नदीची पुनरावृत्ती घडली असती अशी चर्चा सुरू आहे. रात्री उशिरा पाटबंधारे विभागाचे अभियंता तिडके गायधनी कर्मचारी पवार, गोसावी,जाधव यांनी भेट देऊन तातडीने दुरु स्ती करण्याची ग्वाही दिली. सद्या तरी वाहतुक पुर्ण पणे बंद असल्याने यामार्गावरील विद्यार्र्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर प्रवाशांचे हाल झाले आहे.
बेरवाडी पुलावरील वाहतूक बंद; संपर्क तुटल्याने नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 2:46 PM