फैब कंपनीत कामगारांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 04:11 PM2020-09-03T16:11:49+5:302020-09-03T16:12:37+5:30
वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील फैब इंडस्ट्रीज प्रा. ली. कंपनीत कामगारांनी यूनियन स्थापन केल्याबद्दल कंपनी व्यवस्थापकाने सुरक्षारक्षक (बाउंसर) यांना सोबत घेवून कामगारांना बेदम मारहाण केली असल्याची तक्र ार वाडीवºहे पोलिसांत दाखल झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की वाडीवºहे येथील फैब कंपनीमध्ये कामगारांना कायम करणे, किमान वेतन व इतर सवलती मिळण्यासाठी कामगारांनी सीटू संघटनेचे सभासद होत या ठिकाणी सीटू संघटनेची स्थापना केली. मात्र कामगारांनी कोणताही संप न पुकारता काम सुरु च ठेवले होते,असे असतांना कंपनी प्रशासनाने परप्रांतीय कामगारांची भर्ती सुरु केली याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या कामगारांना व्यवस्थापक सचिन चाफेकर यांनी सुरक्षारक्षकांना सोबत घेवून कामगारांचा मोबाइल फेकून देत शिवीगाळ करून त्यांना बेदम मारहाण केली.
या बाबत कामगार प्रकाश देवराम गायकर रा. मुकणे याने वाडीवºहे पोलीस स्टेशनला भादवी ३२३, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आला आहे.
सदर घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने या बाबत तीव्र प्रतिक्रि या उमटल्या आहेत. सदर कंपनी व्यवस्थापकावर कडक कारवाई करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे. तसेच याबाबत सीटू संघटनेने गुरुवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामबंद आंदोलन सुरु केले आहे, आणि जो पर्यन्त कामगारांना मारहाण करणाऱ्यास अटक केली जात नाही तो पर्यन्त आंदोलन सुरु च राहिल असे सिटूचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांनी सांगितले.
यावेळी नरेश आवारी, प्रकाश गायकर, गणेश मुसळे, विक्र म गोवर्धन, सनदीप जाधव, जयराम बरकले, लखन सोनवणे, अशोक कुंदे आदींसह कामगार उपस्थित होते.