घोटी : येथील धरणीमाता वृक्ष संरक्षण फाऊंडेशन ग्रुपच्या पुढाकारातून शहरातील मुख्य मार्गावरील दुभाजकांची रंगरंगोटी करून त्यात विविध रोपे लावून सुशोभिकरण करण्यात आले. यासाठी फाऊंडेशनला ग्रामपालिकेचे सहकार्य लाभले.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करणे व त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी धरणीमाता फाऊंडेशनने घेतली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकांना रंगरंगोटी करून व त्यावर सिमेंटच्या आरसीसी कुंड्या ठेवून त्यामध्ये पर्यावरणाला पूरक अशी झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यावर भर पडली आहे. दुभाजकालगत स्वच्छता राहील व वाहनांमुळे दूषित होणारी हवा शुद्ध होण्यास मदत होईल आणि शहरातील वाहतूकही काही प्रमाणात सुरळीत होणार आहे.या उपक्रमाला उपसरपंच रामदास भोर यांचेही सहकार्य मिळाले. या उपक्रमात ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपालिका व धरणीमाता वृक्षसंवर्धन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय देशपांडे, उपाध्यक्षा पूनम राखेचा, विनायक शिरसाठ, सुधाकर हंडोरे, राजेंद्र सुराणा, गणेश काळे, संतोष वाकचौरे, विजय देशमुख, संदेश मेहता, तुषार बोथरा, परशुराम थोरात आदी उपस्थित होते.
घोटीतील मुख्य रस्त्यावरील दुभाजकाचे सुशोभिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 9:33 PM
घोटी : येथील धरणीमाता वृक्ष संरक्षण फाऊंडेशन ग्रुपच्या पुढाकारातून शहरातील मुख्य मार्गावरील दुभाजकांची रंगरंगोटी करून त्यात विविध रोपे लावून सुशोभिकरण करण्यात आले. यासाठी फाऊंडेशनला ग्रामपालिकेचे सहकार्य लाभले.
ठळक मुद्देशहरातील वाहतूकही काही प्रमाणात सुरळीत होणार आहे.