सायखेडा : मनुष्यबळ विकास मंत्रालय दिल्ली व राष्ट्रीय शैक्षणिक परिषद, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याच धर्तीवर निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे या प्रशिक्षणास सुरवात झाली आहे.उद्घाटन गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्यात्या डॉ. संगीता महाजन, आेंकार वाघ व्यासपीठावर उपस्थित होते. निफाड तालुक्यातील पाच शिक्षकांचे पुणे येथे राज्यस्तरीय पातळीवर प्रशिक्षण झाले. तालुक्यातून रमेश गुरगुडे, मयूरी पंडित, किरण शिंदे, विजय खालकर, दौलत जामकर यांना प्रशिक्षण मिळाले.पिंपळगाव, ओझर,सायखेडा, चांदोरी, निफाड, नांदुर्डी येथे महाविद्यालयात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणास सभापती अनुसूया जगताप, उपसभापती शिवा सुराशे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी भेट दिली.
शिक्षक, केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:38 PM
मनुष्यबळ विकास मंत्रालय दिल्ली व राष्ट्रीय शैक्षणिक परिषद, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याच धर्तीवर निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे या प्रशिक्षणास सुरवात झाली आहे.
ठळक मुद्देगुणवत्तेवर भर : पाच दिवस होणार मार्गदर्शन