लासलगांव : नैताळे व परीसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या नैताळे येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवार (दि.१८) पासुन द्राक्षमणी लिलाव सुरू होणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.नैताळेसह परीसरातील शिवरे, श्रीरामनगर, गाजरवाडी, दिंडोरी, नांदुरमध्यमेश्वर, सोनेवाडी, रामपुर आदि गावांमध्ये शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड केलेली असल्याने त्यांची मालविक्र ीची सोय व्हावी म्हणुन लासलगांव बाजार समितीतर्फे दरवर्षी उगांव, नैताळे व खानगांव नजिक येथे द्राक्षमणी शेतीमालाचे खरेदी-विक्र ी केंद्र सुरू केले जाते. सदर केंद्रास शेतकरी व व्यापारी बांधवांकडून दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यावर्षी नैताळे येथे खरेदी-विक्र ी केंद्र सुरू करण्यासाठी द्राक्षमणी खरेदीदार व्यापाºयांशी चर्चा करून द्राक्षमणी या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.परीसरातील शेतकरी बांधवांनी नैताळे येथील खरेदी-विक्र ी केंद्रावर आपला द्राक्षमणी हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्र ीसाठी आणल्यास वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केली असुन द्राक्षमणी खरेदी करण्यासाठी जास्त व्यापारी इच्छुक असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे शेतकºयांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.भविष्यात शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी द्राक्षमणी हा शेतीमाल खरेदी-विक्र ी केंद्रावरच विक्र ी करावा असे आवाहन होळकर यांनी केले आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शिवार खरेदी करणाºया द्राक्षमणी खरेदीदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.बाजार समितीच्या नैताळे येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर द्राक्षमणी खरेदीस इच्छुक असलेल्या व्यापाºयांनी लायसेन्सबाबतच्या अटी पुर्ण केल्यास संबंधित व्यापाºयांना लायसेन्स देऊन खरेदी-विक्र ी केंद्रावर पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी बाजार समितीच्या लासलगांव मुख्य व निफाड उपकार्यालयाशी संपर्क साधावा.तसेच सोमवारी (दि.१८) नैताळे येथे सायंकाळी ५ वाजता होणाºया द्राक्षमणी लिलाव शुभारंभ प्रसंगी नैताळे व परीसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी, अडते, व्यापारी, ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन होळकर यांनी केले आहे.
नैताळे खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवारपासुन द्राक्षमणी लिलावास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 7:08 PM
लासलगांव : नैताळे व परीसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या नैताळे येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवार (दि.१८) पासुन द्राक्षमणी लिलाव सुरू होणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.
ठळक मुद्देसदर केंद्रास शेतकरी व व्यापारी बांधवांकडून दरवर्षी चांगला प्रतिसाद