माझी कन्या भाग्यश्री योजनेपासून लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 05:42 PM2019-07-03T17:42:58+5:302019-07-03T17:44:16+5:30

देवळा : मुलगी जन्माला आल्यावर आनंदोत्सव साजरा करून मुलीचा जन्म भाग्य समजून तिचे स्वागत करण्यासाठी शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली, परंतु देवळा तालुक्यात सदर योजनेसाठी वाजगाव येथील लाभार्थ्याने तीन वर्षापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल केलेले प्रकरण अद्यापही शासनाच्या लालफितीत अडकल्यामुळे सदर लाभार्थ्यास मनस्ताप सहन करण्याची वेळ येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे आली आहे. देवळा तालुक्यातून ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेसाठी दाखल झालेला हा एकमेव अर्ज आहे.

Beneficiaries deprived of my daughter Bhagyashree scheme | माझी कन्या भाग्यश्री योजनेपासून लाभार्थी वंचित

माझी कन्या भाग्यश्री योजनेपासून लाभार्थी वंचित

Next
ठळक मुद्देदेवळा : एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाचा अनागोंदी कारभार

देवळा : मुलगी जन्माला आल्यावर आनंदोत्सव साजरा करून मुलीचा जन्म भाग्य समजून तिचे स्वागत करण्यासाठी शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली, परंतु देवळा तालुक्यात सदर योजनेसाठी वाजगाव येथील लाभार्थ्याने तीन वर्षापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल केलेले प्रकरण अद्यापही शासनाच्या लालफितीत अडकल्यामुळे सदर लाभार्थ्यास मनस्ताप सहन करण्याची वेळ येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे आली आहे. देवळा तालुक्यातून ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेसाठी दाखल झालेला हा एकमेव अर्ज आहे.
वाजगाव येथील प्रेमानंद आनंदराव देवरे यांनी प्रतिक्षा व अपेक्षा ह्या आपल्या दोन मुलींनंतर २०१६ मध्ये आपल्या पत्नीची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रि या करून घेतली होती. शासनाने जाहीर केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभार्थी होण्यासाठी देवरे कुटुंबिय शासकीय निकषानुसार पात्र ठरले होते. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी देवरे यांनी देवळा येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे अर्ज दाखल केला. यासाठी वैद्यकीय दाखला, त्यांचे व पत्नीचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, दोन्ही मुलींचे जन्म दाखले आदी सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली होती. ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करत असतांना देवरे यांना जिल्हा परिषदेत महिला व बालविकास विभागात हेलपाटे मारावे लागले. २०१७ मध्ये सदरचा अर्ज गहाळ झाला आहे अशी माहीती त्यांना देण्यात आली. त्यामुळे देवरे यांना पुन्हा सर्व कागदपत्रांची पूर्तता करून नवीन अर्ज दाखल करावा लागला. परंतु देवळा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, व नाशिक येथील महीला व बालविकास विभाग यांनी देवरे यांना वेगवेगळया सबबी सांगत व उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा उपक्र म सुरू केला. त्याकरीता देवरे यांना नाशिक येथे वारंवार हेलपाटे मारावे लागले परंतु त्याचा अद्याप उपयोग झालेला नाही.
तीन वर्षापासून प्रकरणाचा पाठपुरावा करत असून देवळा व नाशिक येथील संबंधित विभाग एकमेकांवर या प्रकरणाची जबाबदारी ढकलत वेळ मारून नेत आहे. जमा केलेल्या कागदपत्रांची परत परत मागणी केली जात असून आतापर्यंत तीन वेळा दोन्ही मुलींचे जन्म दाखले जमा केले आहेत. आणि आता कंटाळलो आहे. सभापती केशरबाई अहीरे यांना याबाबत माहिती दिली आहे. परंतु अद्याप लाभ मिळालेला नाही. शासनाची योजना लाभार्थांपर्यंत पोहोचत नसेल तर संबंधित विभागाने प्रकरण होणार नाही असे स्पष्ट करून माझा प्रस्ताव मला परत करावा.
- प्रेमानंद देवरे ( लाभार्थी, वाजगाव )
मुलींचा जन्मदर वाढावा, भृणहत्या रोखाव्यात, मुलींच्या जीवनमानाबद्दल सुरक्षा मिळावी आदी उदात्त हेतूने ‘माझी कन्या भाग्यश्री’ हि योजना सरकारने सुरू केली. परंतु देवळा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अनागोंदी काराभारामुळे देवळा तालुक्यातून तीन वर्षांपूर्वी दाखल झालेले हे एकमेव प्रकरण अद्याप पर्यंत व्यविस्थत न हाताळल्यामुळे लाभार्थी सदर याजनेपासून वंचित राहिला आहे.
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेतील लाभार्थीच्या प्रकरणाची एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात माहिती घेतांना सभापती केशरबाई आहीरे, प्सदस्य धर्मा देवरे, समवेत सहा. प्रशासन अधिकारी आर. आर. सानप आदी.
(फोटो ०३ देवळा)

Web Title: Beneficiaries deprived of my daughter Bhagyashree scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.