तालुकास्तरिय खो-खो स्पर्धेत भरवीर बुद्रुक विद्यालयाचा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 07:00 PM2019-09-10T19:00:30+5:302019-09-10T19:05:33+5:30

नांदूरवैद्य : क्र ीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद यांच्या वतीने आयोजित आहुर्ली येथे पार पडलेल्या तालुकास्तरिय क्र ीडा स्पर्धा प्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते आहुर्लीचे सरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. या स्पर्धेत खो-खो या क्रि डा प्रकारात भरविहीर बुद्रुक येथील जनता विद्यालयाच्या मुलींनी नेत्रदिपक कामगिरी करत प्रथम क्र मांक पटकावला. या मुलींच्या संघाची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.

Bharveer Budruk Vidyalaya's first in the taluka level kho-kho competition | तालुकास्तरिय खो-खो स्पर्धेत भरवीर बुद्रुक विद्यालयाचा प्रथम

खो-खो स्पर्धेत उत्तम कामगिरी करत जिल्हास्तरावर निवड झालेल्या भरविहीर बुद्रुक विद्यालयाच्या मुलींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करतांना विजय सोनवणे समवेत मुख्याध्यापक सी. बी. रु पवते व इतर शिक्षकवृंद व विद्यार्थी.

Next
ठळक मुद्देमुलींच्या संघाची जिल्हास्तरावर निवड

नांदूरवैद्य : क्र ीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद यांच्या वतीने आयोजित आहुर्ली येथे पार पडलेल्या तालुकास्तरिय क्र ीडा स्पर्धा प्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते आहुर्लीचे सरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. या स्पर्धेत खो-खो या क्रि डा प्रकारात भरविहीर बुद्रुक येथील जनता विद्यालयाच्या मुलींनी नेत्रदिपक कामगिरी करत प्रथम क्र मांक पटकावला. या मुलींच्या संघाची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.
या खो-खो स्पर्धेत तालुक्यातील २३ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भरविहीर बुद्रुक शाळेच्या मुलींनी १७ वर्षाखालील वयोगटात मुकणे संघाचा १ डाव १ गुणाने पराभव करत प्रथम क्र मांक पटकावला आहे. या सर्व मुलींचा व क्रि डा शिक्षकांचा इगतपुरी तालुका स्पर्धा प्रमुख विजय सोनवणे तसेच सरपंच यांच्या गौरविण्यात आले.
या स्पर्धेत दिक्षा झनकर, सिद्धी झनकर, प्राची जुंद्रे स्वाती झनकर आदी मुलींनी उल्लेखनीय खेळ खेळत अंतिम फेरीत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. या नेत्रदिपक कामगिरीमुळे या मुलींचा भरविहीर शाळेचे मुख्याध्यापक सी. रु पवते व क्रि डा शिक्षक एन. एम. कासार यांनी कौतूक केले आहे.
या स्पर्धेत पंच म्हणून सुरेश शिंदे, राहुल पंडित यांनी काम पाहिले.
याप्रसंगी तालुका स्पर्धा प्रमुख विजय सोनवणे, मुख्याध्यापक सी. बी. रूपवते, दगडू पवार, एस. एस. उशीर, अशोक आहेर, बी. बी. महाजन, मंसाराम महाले, श्रीमती खत्री, सोनिया रूपवते, श्रीमती रोकडे, बी. आर. गोडसे, एन. एम. पवार आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Bharveer Budruk Vidyalaya's first in the taluka level kho-kho competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kho-Khoखो-खो