लोहोणेर : जिल्ह्यातील बहुतांश भिल्ल समाज हा मृतदेहाचे दफन करत असला तरी याच्या मर्यादा लक्षात घेत देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील भिल्ल समाजातील नागरिकांनी मृतदेह दफन न करता तो दहन करण्याचा बदल स्वीकारला. येथील भिल्लवस्तीत शनिवारी (दि.३०) सायंकाळी सभा घेत या निर्णयावरचे हात उंचावून एकमत नोंदवले. या सामाजिक बदलाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यावेळी झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मीना निकम होत्या.उपसरपंच भाऊसाहेब पगार यांनी या विषयावर मनोगत व्यक्त केले. गावाच्या हद्दीत मृतदेह पुरण्यास जागा उपलब्ध नसल्याने व इतरही काही कारणे असल्याने हा सामाजिक बदल करण्याबाबत भाऊसाहेब पगार यांनी उपस्थितांना आवाहन केले असता यावर सविस्तर चर्चा झाली.अखेर यावर एकमत होत सर्वांनी हात उंचावत या बदलास संमती दिली. तसेच शौचालय वापर, कॉँक्रीटीकरण, रस्ता उपलब्धता आदी विषयांवर माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कारभारी गायकवाड, ठगुबाई पवार, गोविंदा कुवर, सुनंदा सोनवणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ. निंबा भामरे, माजी सरपंच आशा माळी, बारकू जाधव, सुरेश पवार, बाळू पवार, सुधाकर माळी, भीमराव जाधव, अशोक जाधव, जिभाऊ पगारे, बापू थोरात, ज्ञानेश्वर भामरे आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मोठाभाऊ पगार यांनी केले.चौकट....मृतदेह जाळण्यासाठी लाकडांची व इतर साहित्याची आवश्यकता असते आणि परिस्थितीमुळे ते विकत घेणे शक्य होत नसल्याचे महिलांनी सांगितले. त्यावर भिल्ल वस्तीत कुणीही मयत झाल्यास त्याच्या अंत्यविधीचा हा खर्च श्रद्धा फाउंडेशन करेल, त्याबाबत तुम्ही निश्चिन्त रहावे अशी ग्वाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा उपसरपंच भाऊसाहेब पगार यांनी यावेळी दिली.
भिल्ल समाज यापुढे मृतदेह दहन करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 6:48 PM
लोहोणेर : जिल्ह्यातील बहुतांश भिल्ल समाज हा मृतदेहाचे दफन करत असला तरी याच्या मर्यादा लक्षात घेत देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील भिल्ल समाजातील नागरिकांनी मृतदेह दफन न करता तो दहन करण्याचा बदल स्वीकारला.
ठळक मुद्देलोहोणेर : विशेष सभेत एक मताने घेतला निर्णय