नाशिक : मोग्रीप राष्टÑीय दुचाकी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतही सर्वसाधारण विजेतेपद मिळवत राजेंद्र आर. ई. याने विजयाची हॅट््ट्रिक साधली आहे. यापूर्वी इंदूर आणि पुण्यात झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये विजेतेपद मिळविल्यानंतर रविवारीदेखील राजेंद्रने त्याचे कौशल्य पुन्हा एकदा सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले. कोईम्बतूर आणि चिकमंगळूरला होणाºया अन्य दोन फेºयांमध्ये एखाद्या फेरीत राजेंद्र थोडा पुढे-मागे झाला तरी आता अंतिम विजेतेपद अर्थात चॅम्पियनचा किताब त्याच्या नावावर जवळपास निश्चित झाला आहे.रविवारी (दि.१४) नाशिकच्या घोटी-वैतरणा रोडवर झालेल्या ५२ किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत राष्टÑीय स्तराचे ४३ दुचाकी स्पर्धक सहभागी झाले होते. विदेशी बनावटीच्या तेजतर्रार गाड्यांबरोबरच भारतीय बनावटीच्या दुचाकी, बुलेट, स्कूटर अशा विविध प्रकारच्या दुचाकींवर रंगणारी ही स्पर्धा यंदा ऐन पावसाळ्यात होत असल्याने पावसाळी निसरड्या रस्त्यांवर गाड्यांच्या सुसाट वेगाचा थरार अनुभवण्याची संधी वेगाच्या चाहत्यांना मिळाली. या स्पर्धेच्या प्रारंभी झालेल्या दोन्ही फेºया जिंकणाºया टीव्हीएसच्या राजेंद्र आर. ई. याच्यासमोर गतवेळचा विजेता टीव्हीएसचा नटराज याचे आव्हान होते. मात्र, नटराजला १ मिनिट ४६ सेकंद १२९ शतांश सेकंदांनी पिछाडीवर टाकत राजेंद्रने तिसरी फेरीदेखील आपल्या नावावर केली. राजेंद्रने ३६ मिनिटे १० सेकंद ७०९ शतांश सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. क्लास १ ए श्रेणीत बादल दोशी याने ४० मिनिटे, ४१ सेकंद ९१३ सेकंदांसह विजेतेपद मिळवले, तर क्लास २ श्रेणीमध्ये एम. श्रीकांत याने ४४ मिनिटे ४४ सेकंद ८५३ शतांश सेकंदांसह बाजी मारली. क्लास ३ मध्ये अक्षय सिद्धरामय्या याने ४१ मिनिटे ४३ सेकंद ९४० सेकंदांसह विजेतेपदाला गवसणी घातली. क्लास ४ मध्ये इमरान पाशा याने अफलातून कामगिरी करीत सर्वसाधारण विजेत्या गटाच्या मागोमाग दुसºया क्रमांकाची कामगिरी केली. इमरानने ३८ मिनिटे ०३ सेकंद २९१ शतांश सेकंदात गटाचे विजेतेपद मिळवले, तर क्लास ५ मध्ये विक्रम के. याने ४३ मिनिटे १९ सेकंद ४२१ शतांश सेकंद वेळ नोंदवत गटाच्या विजेतेपदाला गवसणी घातली. क्लास ६ मध्ये सुहैल अहमद याने ४१ मिनिटे ३७ सेकंद ८७४ शतांश सेकंदांची वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला.स्टार आॅफ नाशिक गटात नवदीपची बाजीस्टार आॅफ नाशिक या केवळ नाशिककर दुचाकीचालकांसाठीच्या गटात नवदीप राव याने ४५ मिनिटे ४६ सेकंद ४९ शतांश सेकंदांसह बाजी मारली. कौस्तुभ मच्छे याने ४६ मिनिटे ४१ सेकंद ४५१ शतांश सेकंदांसह द्वितीय, तर हर्षल कडभाने याने ४६ मिनिटे ४४ सेकंद ५६८ शतांश सेकंद अशी वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला.स्कूटर गटातनाशिकची निराशास्कूटर गटातील माजी विजेता नाशिकचा शमीम खान अखेरच्या स्थानावर फेकला गेल्याने नाशिककरांची निराशा झाली. या गटात सय्यद असिफ अली याने ४४ मिनिटे ४४ सेकंद १५५ शतांश सेकंदात बाजी मारत स्कूटर गटातही बाजी मारली, तर महिलांच्या गटात सहभागी झालेली एकमेव स्पर्धक ऐश्वर्या पिसे हिने ४७ मिनिटे ५३ सेकंद ६४३ शतांश सेकंदात शर्यत पूर्ण केली.
घाट रस्त्यांवर रंगला बाइकचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:22 AM
मोग्रीप राष्टÑीय दुचाकी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतही सर्वसाधारण विजेतेपद मिळवत राजेंद्र आर. ई. याने विजयाची हॅट््ट्रिक साधली आहे. यापूर्वी इंदूर आणि पुण्यात झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये विजेतेपद मिळविल्यानंतर रविवारीदेखील राजेंद्रने त्याचे कौशल्य पुन्हा एकदा सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले.
ठळक मुद्देराजेंद्रची हॅट्ट्रिक : मोग्रीप राष्टÑीय दुचाकी अजिंक्यपद स्पर्धा घोटी-वैतरणा रोडवर रंगली