जैव-वैद्यक कचरा व्यवस्थापन प्र्रणाली प्रक्रिया आधारित असावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:09 AM2017-12-09T00:09:16+5:302017-12-09T00:27:56+5:30
जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचºयाचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भीती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव-वैद्यकीय कचºयाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी जैव-वैद्यक कचºयाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन या कचºयाची व्यवस्थापनप्रणाली ही व्यक्तीवर नव्हे तर प्रक्रियेवर आधारित असावी, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.
नाशिक : जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचºयाचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भीती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव-वैद्यकीय कचºयाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी जैव-वैद्यक कचºयाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन या कचºयाची व्यवस्थापनप्रणाली ही व्यक्तीवर नव्हे तर प्रक्रियेवर आधारित असावी, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ग्लोबल इनव्हायरमेंट फॅसिलिटी (जीईए), युनायटेड नेशन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन (युनिडो) व केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्या संयुक्त ‘जैव-वैद्यकीय कचºयाचे पर्यावरणदृष्ट्या सुयोग्य व्यवस्थापन’ प्र्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्यातून सुरू करण्यात आलेल्या पथदर्शी अभियानाचे शहरातील एका तारांकित हॉटेलमध्ये देवयानी फरांदे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ८) उद्घाटन झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर विएन्ना येथील युनिडोच्या मुख्यालयातील प्रकल्प व्यवस्थापक एर्लिंडा गलवेन, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे संचालक मनोजकुमार गांगेया, राज्य पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवळी, जीईए व युनिडोचे प्रादेशिक समन्वयक डॉ. शक्तिप्रसाद धुआ, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना फरांदे यांनी जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायदा हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी असून, यातील डॉक्टर महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करताना एमपीसीबीच्या अधिकाºयांनी डॉक्टरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचेही सांगितले. तसेच रुग्णालय व्यवस्थापनात औषधनिर्माण शास्त्रातील विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते व सतीश गवळी यांच्या हस्ते जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व निर्मूलनासंबंधी जनजागृती करणाºया मोबाइल अॅपचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानाची जनजागृती करणाºया माहितीपटाचेही यावेळी अनावरण करण्यात आले. दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांना जैव-वैद्यक कचºयाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक कचराकुंड्या प्रातिनिधिक स्वरूपात भेट देण्यात आल्या. डॉ. शक्तिप्रसाद धुआ यांनी प्रास्ताविक केले. आर. यू. पाटील यांनी आभार मानले.
महापालिका घरगुती कचºयाचे घंटागाडीच्या माध्यमातून संकलन करून कचºयाचे पर्यावरणपूरक दृष्टीने व्यवस्थापन व निर्मूलन करते. त्याचप्रमाणे जैव-वैद्यक कचºयाच्या व्यवस्थापनासाठी सर्व वैद्यकीय रुग्णालये, मेडिकल्स, डॉक्टर्स, परिचारिका, विद्यार्थी यांनी अधिक जबाबदारीने कचºयाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
- रंजना भानसी, महापौर, नाशिक
जैव-वैद्यकीय कचºयापासून होणारे रोगांचे संसर्ग तसेच विषारी वायूंच्या निर्मितीसारखे दुष्परिणाम रोखण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने कचºयाचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल महत्त्वपूर्ण आहे. - सीमा हिरे, आमदार, नाशिक