पक्षी-प्राणिप्रेमीही मनपाच्या रडारवर

By admin | Published: November 12, 2016 10:01 PM2016-11-12T22:01:02+5:302016-11-12T22:03:17+5:30

डेंग्यूचा डंख : दहा दिवसांत २९ रुग्णांना लागण

Bird-oriented on the map's radar | पक्षी-प्राणिप्रेमीही मनपाच्या रडारवर

पक्षी-प्राणिप्रेमीही मनपाच्या रडारवर

Next

 नाशिक : शहरात थंडीचे प्रमाण वाढले तरी अजूनही विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूची लागण झालेले रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून, गेल्या दहा दिवसांत १०९ संशयितांपैकी २९ रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे. दरम्यान, महापालिकेने आता पक्षी-प्राणिप्रेमींकडून साठविल्या जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष केंद्रित केले असून, नवीन बांधकामांच्या ठिकाणीही तपासणी सुरू केली आहे.
महापालिका हद्दीत डेंग्यूच्या आजाराने अजूनही नाशिककरांची पाठ सोडलेली नाही. सप्टेंबर महिन्यात ६४० संशयितांचे रक्तजल नमुने तपासण्यात आले असता १७५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते तर आॅक्टोबर महिन्यात ३९८ रक्तजल नमुने तपासण्यात आले असता १३५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले होते. गेल्या दहा दिवसांत १०९ रक्तजलनमुने तपासण्यात आले आहेत.त्यापैकी २९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. शहरात गेल्या काही दिवसात थंडीच्या प्रमाणात वाढ होऊनही डेंग्यूचा प्रभाव कायम आहे. पावसाळा संपून दीड महिना उलटल्याने आता घरांघरांमध्येच साठविलेल्या पाण्यात डेंग्यूच्या एडीस जातीच्या डासांच्या अळ्या सापडत आहेत. त्यात विशेषत: पक्षी-प्राणिप्रेमी हे पक्षी आणि प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी भांड्यात ठेवतात परंतु ते पाणी बदलत नसल्याने त्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. प्रामुख्याने, सातपूर भागात असा प्रकार मोठ्या प्रमाणात निदर्शनास आल्याने मनपाने आता पक्षी-प्राणी प्रेमींवरही लक्ष केंद्रीत केले असून त्यांना समज दिली जात आहे.

Web Title: Bird-oriented on the map's radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.