विश्वास नांगरे-पाटील : महामॅरेथॉन स्पर्धा आपली ऊर्जामापक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 07:15 PM2019-11-30T19:15:32+5:302019-11-30T19:16:47+5:30

नाशिक : धावण्याची पॅशन असलेल्या नाशिकसारख्या महानगरात ‘लोकमत’ची महा मॅरेथॉन डोळे दिपविणारीच असते. या महा मॅरेथॉनच्या स्पर्धा म्हणजे आपल्या ...

Biswas Nangare-Patil: Mahamarathon Competition Your Power Measure! | विश्वास नांगरे-पाटील : महामॅरेथॉन स्पर्धा आपली ऊर्जामापक !

विश्वास नांगरे-पाटील : महामॅरेथॉन स्पर्धा आपली ऊर्जामापक !

googlenewsNext
ठळक मुद्दे२५०हून अधिक पोलीस स्पर्धेत सहभागी होणार नाशिककरांचा उत्साह हा महामॅरेथॉनमध्ये कायमच दिसून येतो.

नाशिक : धावण्याची पॅशन असलेल्या नाशिकसारख्या महानगरात ‘लोकमत’ची महामॅरेथॉन डोळे दिपविणारीच असते. या महामॅरेथॉनच्या स्पर्धा म्हणजे आपल्या ऊर्जामापक असून, त्यातून धावणाऱ्यांना ऊर्जा, तर बघणाऱ्यांनाही अनोखी प्रेरणा मिळत असते, अशा शब्दांत तरूणांचे आयडॉल व नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महामॅरेथॉनविषयी गौरवोद्गार काढले.
निमित्त होते, राजुरी स्टील प्रस्तुत नाशिक महामॅरेथॉनच्या ‘बीब कलेक्शन एक्स्पो’चे. शनिवारी (दि३०) उत्साहात अन्् जल्लोष पूर्ण वातावरणात महामॅरेथॉनसाठी नोंदणी केलेल्या धावपटूंनी आपली ‘तयारी’ या बिब एक्स्पोपासून केली. एक्स्पोच्या शुभारंभप्रसंगी नांगरे-पाटील यांनी उद्घाटक म्हणून बोलत होते.

त्र्यंबकरोडवरील फ्रावशी अकॅडमीच्या प्रांगणात एक्स्पोच्या दीपप्रज्वलनप्रसंगी व्यासपीठावर लोकमत महामॅरेथॉनच्या संकल्पक तथा संयोजक रुचिरा दर्डा, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, राजुरी स्टीलचे वितरक मनू चांदवानी, हेमंत कोठावदे, प्रकाश पटेल, एचडीएफसी होम लोन्स लिमिटेडचे बिजनेस हेड संदीप कुलकर्णी, विपणन प्रमुख समीर दातरंगे, एसएमबीटीचे हर्षल तांबे, फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे तांत्रिक संचालक अशोक थरानी, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक तुलसीदास गडपायले, विपणनप्रमुख प्रदीप जोशी, कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक देवेश कारडा, अपोलो हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरी मेनन, अपोलोचे डॉ. मंगेश जाधव, सोनी गिफ्ट्सचे संचालक नितीन मुलतानी, साक्षी अ‍ॅडव्हर्टायजिंगचे संचालक सचिन गिते, स्टर्लिंग मोटर्सचे महाव्यवस्थापक महेश राठी, सह्याद्री फार्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षितीज अग्रवाल, वरुण अ‍ॅग्रोच्या संचालक मनीषा धात्रक आणि शशीकांत धात्रक, न्यूट्रिकेअरच्या रश्मी सोमाणी, गौरव सोमाणी, मधुर जयदेव गृह उद्योगचे संचालक धर्मेंद तरानी, जेम्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रमुख आणि स्थायीच्या माजी सभापती हिमगौरी आडके, रिलॅक्स झीलचे संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नांगरे-पाटील म्हणाले, यांनी मी पूर्वीपासून स्वत:च्या तंदुरुस्तीवर भर देत आलो. त्यादृष्टीने व्यायामासाठी वेळ देत आल्याचे नमूद केले. लोकमतच्या या महामॅरेथॉनमध्ये दरवर्षी पाच हजारांहून अधिक धावपटू सहभागी होत असतात. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सुयोग्य असे नियोजन आणि त्यामध्ये असलेली सुसुत्रता. उत्कृष्ट नियोजनामुळेचे मॅरेथॉनचे सर्व निकष ही स्पर्धा पुर्ण करणारी ठरते, त्यामुळे या स्पर्धेेत सहभागी होऊन धावण्याचा अनुभव स्पर्धकांना खूप काही शिकवून जातो, असेही नांगरे पाटील म्हणाले. माझ्यासह तब्बल २५०हून अधिक पोलीस सहकारी स्पर्धेत सहभागी होणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रास्ताविकात बोलताना लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी महामॅरेथॉनच्या तृतीय पर्वातही नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येत असून अशाच जल्लोषात रविवारी (दि.१) हजारो स्पर्धक नाशिककर धावनमार्गांवरून धावत ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होणार आहेत. नाशिककरांचा उत्साह हा महामॅरेथॉनमध्ये कायमच दिसून येतो. दिवसभराच्या कार्यक्रमात अ‍ॅँकर विशू यांनी अनेक मान्यवर, पाहुण्यांच्या आणि उत्साही धावपटू गटप्रमुखांच्या मुलाखती घेऊन कार्यक्रमात रंगत भरली.

 

Web Title: Biswas Nangare-Patil: Mahamarathon Competition Your Power Measure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.