बिटस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 06:31 PM2020-01-01T18:31:44+5:302020-01-01T18:36:22+5:30

औदाणे : यशवंतनगर (त्ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या स्पर्धेचे उद्घ घाटन जिल्हा परिषद सदस्या लता बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले.

Bit-level zilla parishad champions championship | बिटस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

यशवंनगर येथील जिल्हा परिषद शाळेत अध्यक्ष चषक स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी लता बच्छाव, विजय पगार, डी. जे काकळीज, रवींद्र चौरे, अंबादास आहीरे, वामन चौरे आदी.

Next
ठळक मुद्देअजमीर व लखमापूर केंद्रातील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी

औदाणे : यशवंतनगर (त्ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या स्पर्धेचे उद्घ घाटन जिल्हा परिषद सदस्या लता बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मिच्छंद्र गवळी व प्रमुख पाहुणे म्हणून विस्ताराधिकारी अधिकारी विजय पगार केंद्रप्रमुख डी. जे काकळीज, सरपंच रवींद्र चौरे अंबादास आहीरे, नरेंद्र आहिरे, श्रीधर बागुल होते. यावेळी अजमीर व लखमापूर केंद्रातील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धेचा निकाल असा-
प्रथम वकृत्वस्पर्धा - सिद्धी आहीरे (वायगाव) ४०० मीटर धावणे मुले - सागर पवार (यशवंनगर) २०० मीटर धावणे मुली - दीपाली गोयकर (वायगाव) वयक्तिक नृत्य तनुजा सोनवणे (वायगाव) वैयक्तिक गीत गायन (वायगांव) चित्रकला - दीपक शिंदे (भामेश्वर) कबड्डी मुले - (भामेश्वर) खो खो मुले - (भामेश्वर) खो खो मुली (वायगाव)
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कौतीक बच्छाव, विलास पवार, अविनाश पगार, भास्कर कोर, रावसाहेब खैरनार, रोहीणी पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार अंबादास अहिरे यांनी मानले.
 

Web Title: Bit-level zilla parishad champions championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.