लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : सातपूरच्या मळे परिसरातील गोरक्ष सोनवणे यांच्या शेतात रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने पाणी पिल्यानंतर वेगाने दुसऱ्या शेतात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शेताला तारेचे कुंपण असल्याने तो जखमी झाल्याचे घटनास्थळी सांडलेल्या रक्तावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मळे परिसरात शेतकऱ्यांसह मजुरांचीही लहान मुले असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.रविवारी पहाटे अचानक सोनवणे यांच्या शेतातील कुत्रे जोर जोरात भुंकू लागली. त्यामुळे सोनवणे यांनी कानोसा घेतला असता त्यांना बादलीतील पाणी पिताना बिबट्यासारखा प्राणी नजरेस पडला. सकाळी त्यांनी शेताची पाहणी केली असता त्यांच्या शेतालगतच असलेल्या तारेच्या कुंपणाला बिबट्याचे केस व पंजाचे निशाण दिसले. रात्रीच्या वेळी बिबट्या कुंपणाला अडकल्याने त्याचे रक्त घटनास्थळी तसेच पपईच्या झाडावर आढळून आले. चवताळलेल्या बिबट्याने पपईच्या झाडावर हाताच्या पंजाने ओरखडे केले असून, याच झाडावरून उडी घेऊन पलीकडच्या शेतात पलायन केले.
सातपूरच्या मळे परिसरात बिबट्या जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 1:13 AM
सातपूर : सातपूरच्या मळे परिसरातील गोरक्ष सोनवणे यांच्या शेतात रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने पाणी पिल्यानंतर वेगाने दुसऱ्या शेतात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शेताला तारेचे कुंपण असल्याने तो जखमी झाल्याचे घटनास्थळी सांडलेल्या रक्तावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मळे परिसरात शेतकऱ्यांसह मजुरांचीही लहान मुले असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्देपरिसरात शेतकऱ्यांसह मजुरांचीही लहान मुले असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण