शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
2
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
3
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
4
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
5
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
6
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
7
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
8
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
9
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
10
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
11
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
12
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
13
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
14
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
15
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
16
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
17
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
18
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
19
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
20
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 

बिटको व शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:47 AM

अत्यंत रहदारी असलेल्या बिटको व शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालक खड्डे चुकवत वाहने चालवत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिकरोड : अत्यंत रहदारी असलेल्या बिटको व शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालक खड्डे चुकवत वाहने चालवत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.सकाळपासून रात्रीपर्यंत बिटको चौक, शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली सर्व प्रकारच्या वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. बिटको चौकात सिग्नल सुटल्यानंतर खड्ड्यामुळे वाहने धीम्या गतीने जातात. त्याचवेळी दुसरा सिग्नल सुटत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच शिवाजी पुतळा उड्डाणपुलाखाली चौकातदेखील खड्डे पडले असून, पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. यामुळे वाहनधारक खड्डा वाचविण्यासाठी आडवीतिडवी वाहने चालवत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. डांबर वाहून गेल्याने रस्त्यावर खडी पसरल्याने दुचाकी स्लिप होण्याचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यामुळे वाहने हळूहळू तेथून जात असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन गोंधळ निर्माण होतो. बिटको व शिवाजी पुतळा चौकात सार्वजनिक वाहतुकीची वर्दळ आहे. तसेच दत्तमंदिर रोडवरून गायखे कॉलनी जलतरण तलाव रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनधारक, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मनपा प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.उड्डाणपुलाखालील भाजीबाजार स्थलांतरित करण्याचे प्रयत्न यापूर्वी अपयशी ठरले आहेत. सदर बाजार याचठिकाणी राहणार असेल तर अधिकृतपणे नियोजनबद्ध बाजारासाठी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने पे अ‍ॅण्ड पार्किंग, नो पार्किंग झोन निर्माण करण्याची गरज आहे. परंतु नाशिकरोडमधील केवळ बिटको चौकमध्ये तर सर्वत्र वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे, बाजारपेठ असो की बसस्थानक कुठेही वाहतूक नियोजन आणि पार्किंग सुविधा यांचा विचार झाल्याचे दिसत नाही. या साऱ्या प्रकारामुळे नाशिकरोडचा वाहतूक प्रश्नदेखील गंभीर बनला आहे. जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी नाशिकरोडच्या सुशोभिकरणासाठी भूमिका घ्यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.अतिक्रमणाला कोण जबाबदार?नाशिकरोडमधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बिटको चौकात वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगचे कोणतेही नियोजन नसल्याने या चौकाचा श्वास कोंडला आहे. वास्तविक नाशिकरोडचे महत्त्वाचे ठिकाण असल्याने या चौकाचा नियोजनबद्ध विकास होणे अपेक्षित होते. मात्र उदासीन प्रतिनिधी आणि सामाजिक संस्था याबाबत फारसे आग्रही दिसून येत नसल्याने महापालिकेने नेहमीच बिटको चौकाकडे दुर्लक्ष केले आहे. उड्डाणपुलामुळे नाशिकरोडचे सौंदर्य वाढण्यास मदत होणे अपेक्षित असताना या उलट कोंडी आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेचे चित्र दिसून येते. याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी