शासनाच्या निषेधाचा हा काळा दिवस..

By admin | Published: February 15, 2017 11:05 PM2017-02-15T23:05:22+5:302017-02-15T23:05:35+5:30

सुप्रिया सुळे : कांदा जाळलेल्या शेतात शेतकऱ्यांशी संवाद

This black day of government protest ... | शासनाच्या निषेधाचा हा काळा दिवस..

शासनाच्या निषेधाचा हा काळा दिवस..

Next

येवला : या देशाचा अन्नदाता शेतकरी आपल्या शेतात मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याचे भाव कोसळत असल्याने त्याला जगणे मुश्कील झाले आहे. येवल्याचा शेतकरी कांदा जाळून शासनाचा निषेध करत संताप व्यक्त करत आहे. जगाचा पोशिंदा आज आपल्याच शेतातील पीक जाळतो हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने येवला तालुका दौऱ्यावर असताना, नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने उत्पादन खर्चदेखील फिटत नसल्याने आपल्याच शेतातील काढणीला आलेला कांदा जाळून शासनाच्या कांद्याबाबतच्या निष्क्रिय धोरणाचा निषेध केल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदगावचे आमदार पंकज भुजबळ, माजी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, राष्ट्रवादी युवा नेते सचिन कळमकर, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, सुभाष निकम, सरपंच प्रसाद पाटील, बाळासाहेब लोखंडे, उपसरपंच नवनाथ बागल यांच्या समवेत थेट या शेतकऱ्याच्या शेतावर धाव घेतली व शेताची पाहणी करून आस्थेने चौकशी केली. (वार्ताहर)

Web Title: This black day of government protest ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.