तेजस पुराणिक, नाशिक : ईडीने आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतअटक केली. त्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने शुक्रवारी(दि.२२) नाशिक शहरातील मेहेर येथे रास्ता रोको करण्यात आले तसेच टायर पेटवण्यात आले. त्यानंतर पोलीसांनी कार्यकत्य'ांना ताब्यात घेतले. मद्य घोटाळ्याचा आरोप ठेवत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरूवारी (दि.२१) अटक करण्यात आली.
त्याचे पडसाद म्हणून नाशिकमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली तसेच काही कार्यकत्य'ांनी महात्मा गांधी रोड येथे रस्ता रोको सुरू केले. तसेच कायर्कत्य'ांनी टायर देखील पेटवले.
या आंदोलनात आपचे राज्य संघटन सचिव नविंदर अहलुवालिया, शहराध्यक्ष अमोल लांडगे, माजी उत्तर महाराष्ट्र सचिव प्रभाकर वायचळे, गिरीश उगले, बंडू नाना डांगे, अनिल कौशिक, महिला प्रतिनिधी निर्मला दाणी, मंजू जगताप,प्रमोदिनी चव्हाण,अल्ताफ शेख ,विकास पाटील यांच्यासह अन्यपदाधिकारी सहभागी झाले होते.