खंडोबा यात्रेनिमित्त ४० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 03:53 PM2020-12-22T15:53:22+5:302020-12-22T15:54:52+5:30

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव, धोंडवीरनगर येथील ४० जणांनी रक्तदान करून चंपाषष्ठीला अनोख्या पध्दतीने खंडोबा महाराजांची यात्रा साजरी केली.

Blood donation of 40 people for Khandoba Yatra | खंडोबा यात्रेनिमित्त ४० जणांचे रक्तदान

खंडोबा यात्रेनिमित्त ४० जणांचे रक्तदान

Next
ठळक मुद्देसामाजिक उपक्रम : मनेगाव, धोंडवीरनगर येथील तरुणांचा पुढाकार

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव, धोंडवीरनगर येथील ४० जणांनी रक्तदान करून चंपाषष्ठीला अनोख्या पध्दतीने खंडोबा महाराजांची यात्रा साजरी केली.
कारोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द झाल्याने काही तरी वेगळ्या पध्दतीने यात्रा साजरी करण्याचा मानस व्यक्त केल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये उमेश सोनवणे, अमोल गायकवाड, सोनवणे पुंडलिक, अजिंक्य ढवण, नंदू गायकवाड, प्रणित ढवण, अरुण मडके, संदीप रोकडे, भानुदास सोनवणे, विकास सोनवणे, डॉ. विवेक सोनवणे, मयूर शिरसाट, मंगेश शेळके, अक्षय सोनवणे, संजय कांबळे, गोविंद सोनवणे, नितीन सोनवणे, किरण बुचडे, मयूर आंबेकर, परशुराम मडके, भगीरथ्लृ करडग, राजेश सोनवणे, अजित गायकवाड, प्रदीप सोनवणे आदींसह गावकर्‍यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
शिबिरास सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. निर्मला पवार, डॉ. दीपाली देसले, अनिल मोरे, रमिजा शेराड, अमोल भिये, पावसकर, राजकुमार मोरे, कावेरी निर्भवणे यांनी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदात्यांसाठी वाहन उपलब्ध करून दिले.
यावेळी त्र्यंबक सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, सी. डी. भोजने, जगन्नाथ खोळंबे, योगेश माळी, रामा बुचडे, अशोक बुचडे आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी मयूर शिरसाट, विकास सोनवणे, रामदास शिंदे, संदीप जेडगुले, शरद गायकवाड, प्रा. राजेंद्र सोनवणे, किरण बुचडे, सम्राट मित्र मंडळ व तरुणवर्गाने सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 40 people for Khandoba Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.