बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:10 AM2019-09-15T01:10:08+5:302019-09-15T01:11:25+5:30
गंगापूरगावाच्या शिवारात सोमेश्वरजवळ अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करताना तिघे गोदापात्रात बुडाले होते. त्यापैकी दोघांना वाचविण्यात अग्निशमन, जीवरक्षक दलाला यश आले. गणेशमूर्ती विसर्जित करताना नदीपात्रात बुडालेल्या गणेश पांडुरंग धांडगे या तरुणाचा मृतदेह शनिवारी (दि.१४) सोमेश्वरजवळ नदीपात्रात आढळून आला.
नाशिक : गंगापूरगावाच्या शिवारात सोमेश्वरजवळ अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करताना तिघे गोदापात्रात बुडाले होते. त्यापैकी दोघांना वाचविण्यात अग्निशमन, जीवरक्षक दलाला यश आले. गणेशमूर्ती विसर्जित करताना नदीपात्रात बुडालेल्या गणेश पांडुरंग धांडगे या तरुणाचा मृतदेह शनिवारी (दि.१४) सोमेश्वरजवळ नदीपात्रात आढळून आला.
गुरुवारी गणेश व त्याचे मित्र विसर्जनासाठी सोमेश्वर धबधबा भागात गेले होते. यावेळी तिघे पाय घसरून गोदावरीत पडले. जीवरक्षक आणि अग्निशमन दलासह तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी नदीपात्रात उड्या घेऊन वाहून जाणाऱ्या रोहित गवई, राजू भालेराव यांना वाचिवले, मात्र गणेश हा पुढे वाहून गेला होता.
त्याचा शोध सायंकाळपर्यंत घेतला गेला, मात्र तो आढळून आला नाही.
शनिवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह सोमेश्वर मंदिर परिसरात गोदापात्रात पाण्यावर तरंगताना येथील काही नागरिकांना आढळला. घटनेची माहिती तत्काळ पोलीस व अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीपात्रातून गणेशचा मृतदेह बाहेर काढून त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी पंचनामा करून मृत्युची नोंद केली आहे.