आराई येथील बोगस डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 05:34 PM2019-04-10T17:34:44+5:302019-04-10T17:36:53+5:30

सटाणा : तालुक्यातील आराई येथे वैद्यकीय पथकाने बोगस डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असले तरी अद्याप पोलिसांत त्या डॉक्टरविरु द्ध गुन्हा दाखल न केल्याने पथक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Bogus doctor's clinic raided in Arai | आराई येथील बोगस डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा

आराई येथील बोगस डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा

Next
ठळक मुद्देगावातील एका रु ग्णाला उपचारादरम्यान त्रास झाला होता.

सटाणा : तालुक्यातील आराई येथे वैद्यकीय पथकाने बोगस डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असले तरी अद्याप पोलिसांत त्या डॉक्टरविरु द्ध गुन्हा दाखल न केल्याने पथक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
बोगस डॉक्टरांसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तक्र ारी होत्या; मात्र कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे तक्र ार केल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान, याची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार सटाणा यांच्या पथकाने मंगळवारी (दि.९) दुपारी १वाजेच्या सुमारास या बोगस डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकला.
छाप्यात डॉक्टर बोगस असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी हेमंत अहिरराव यांनी सांगितले. दरम्यान त्याच्याकडे औषधे आणि बोगस प्रमाणपत्र आढळून आली आहेत. पथकाने कागदपत्रे आणि औषधांचा पंचनामा करून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविला आहे.
आराईचे सरपंच धीरज सोनवणे व सदस्य राहुल आहेर यांनी आरोग्य विभागाकडे बोगस डॉक्टरांविषयी तक्र ार केली होती. या डॉक्टरचे बारावीपर्यंतच शिक्षण झाले असून, त्याच्याकडे बोगस पदवी असल्याचे आढळून आले आहे. तालुक्यात अजूनही अनेक गावांमध्ये पदवी नसताना बोगस क्लिनिक सुरू आहेत. मात्र वैद्यकीय पथकाकडून वर्ष सहा महिन्यात कारवाई करून एकप्रकारे फार्स केल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून आराई येथे बोगस डॉक्टर के.डी गोसावी याने आपला वैद्यकीय व्यवसाय थाटला होता. ग्रामीण भागात गेल्या अनेक दिवसांपासून विनापरवानगी क्लिनिक सुरू असताना आरोग्य विभागाने दुर्लक्ष का केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावातील एका रु ग्णाला उपचारादरम्यान त्रास झाला होता. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

Web Title: Bogus doctor's clinic raided in Arai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.