राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडत असून वीज पुरवठा खंडित झाला की, मोबाइल सेवा ठप्प होते. या विस्कळीत झालेल्या सेवेकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने राजापूर ग्रामस्थांत नाराजी आहे.राजापूर येथे बरेच कृषी प्लॅन ग्राहक तसेच ब्राड ब्रँडची सेवा घेतलेली असून ग्राहकांना पाहिजे तशी सेवा मिळत नसल्यामुळे अनेक ग्राहक हे बीएसएनएलला वैतागून दुसऱ्या कंपनीकडे आपले मोबाइल पोर्ट करीत आहेत.राजापूर येथील सेवा ही असून अडचण नसून खोळंबा, अशी झाली आहे. या सेवेचा फटका राजापूर येथील बँक व गॅस वितरण एजन्सीला फटका बसत आहे. लाइट गेल्यास फोनची रेंज बंद होते व वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत वाट पाहावी लागते आहे. ऑनलाइन कामात अडथळा निर्माण होत असतो. अधिकाऱ्यांनी या सेवेकडे लक्ष देऊन सेवा कार्यान्वित करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.बीएसएनएलची सुविधा चांगली असून ती सेवा मिळत नाही. वीज पुरवठा खंडित झाला की, मोबाइल टॉवर बंद पडतो व फोन येणे बंद होते. ग्राहकांना या सेवेमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसतो आहे.दर महिन्याला रिचार्ज हा करावाच लागतो; परंतु लाइट गेल्यास ही सेवा पूर्णपणे बंद होते. त्यामुळे येथील सेवेकडे लक्ष देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.लाइट गेल्यास बीएसएनएल सेवा पूर्णपणे ठप्प होते. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ही सेवा सुरू होते. ऑनलाइन कामात अडथळा निर्माण होत आहे. ब्रॉड बँड सेवा घेतलेली असून वेळेवर बिल भरत असूनही पाहिजे त्या प्रमाणात सेवा मिळत नाही. त्यामुळे ही सेवा अन्य कंपन्यांकडे वर्ग करण्याचा विचार होत आहे.- समाधान चव्हाण, गॅस वितरक, राजापूर.
राजापूर येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 6:43 PM
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडत असून वीज पुरवठा खंडित झाला की, मोबाइल सेवा ठप्प होते. या विस्कळीत झालेल्या सेवेकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने राजापूर ग्रामस्थांत नाराजी आहे.
ठळक मुद्देबीएसएनएलला वैतागून दुसऱ्या कंपनीकडे आपले मोबाइल पोर्ट करीत आहेत.