विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानाच्या प्रस्तावासाठी पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:16 AM2021-09-14T04:16:51+5:302021-09-14T04:16:51+5:30
चौकट- आधी काय होते दोन पर्याय नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपणीच्या ॲपवर नोंदणी ...
चौकट-
आधी काय होते दोन पर्याय
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपणीच्या ॲपवर नोंदणी करून कंपनीला नुकसानाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले होते. ग्रामीण भागात असलेला कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आणि इतरही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना ते शक्य होत नव्हते.
चौकट-
हे आहेत नवीन पर्याय
नवीन पर्यायानुसार कंपन्यांनी ७२ तासांची अट कायम ठेवली असली तरी त्यानंतर आलेली माहितीही ग्राह्य धरली जाणार आहे. याशिवाय केवळ ॲपवरच नोंदणी करण्याचे बंधन कमी करण्यात आले असून, आता शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी, तालुका कृषी अधिकारी यांना माहिती दिली तरी चालु शकते. याशिवाय कंपनीला थेट इ-मेल पाठविला, तरीही त्याची नोंद घेतली जाणार आहे.
चौकय-
अतिवृष्टीने २६ हजार हेक्टरचे नुकसान
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव या तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण २६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, तसा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे.
कोट-
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळविण्याची अट कायम असली तरी आता त्यात थोडी शिथिलता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय किंवा गावातील तलाठ्यांना नुकसानाची माहिती दिली तरी चालणार आहे. - भिवसेन वरघडे, विभागीय कृषी सांख्यीकी अधिकारी.