पांडाणे : दिंडोरी तालुक्यात निसर्ग चक्र ीवादळच्या दिवसापासुन पावसाला सुरवात झाल्यापासून ते ७ जुनपर्यत समाधानकारक पाऊस झाला होता. परंतू त्यानंतरपावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप पिकाच्या पेरणी व भात लागवडीला ब्रेक लागला असून शेतकऱ्याचे पावसाकडे नजर लागली आहे .दिंडोरी तालुक्यात पहील्या पावसात सुमारे २०७२ हेक्टर पिकावर सोयाबिनची पेरणी झाली आहे. परंतू काही भागात पावसाने पाठ फिरवल्यामुळे सोयाबीन, मका, उडीद, मुग, पेहरणीला ब्रेक लागला असून आता ६ ते ७० मीलीमिटर ओलावा आल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांनी सांगितले.दिंडोरी तालुक्याच्या पाश्चिम पट्यात भात, नागली वरई, खुरसणी हे पावसावर अवलंबून असलेले पिक घेतले जाते. परंतू या वर्षी सुरवातीला मृग नक्षत्रात चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे साधारण तालुक्यात ३५ ते ४० टक्के शेतकºयांनी मका, भुईमुग, सोयाबिन, उडीद, मुग या पिकांची पेरणी पूर्ण झाली असून परंतू सद्या पाऊस नसल्यामुळे सर्वच पिकांचे वाताहत झाली आहे. ज्या शेतकºयांकडे पाण्याची व्यवस्था आहे. त्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीनला विहीरीचे पाणी भरून ओलावा जमीनीत तयार करू दिला आहे.बºयाच शेतकºयांना सोयाबिनची बियाणे मिळाली नव्हती, त्यावेळी दिंडोरी तालुक्यातील कृषी विभागामार्फत तालुक्यातील प्रत्येक गावातील सोयाबिनची माहीती संकलीत करून त्या सोयाबिनची उगवण क्षमता तपासून आपआपल्या गावाच्या व परिसरातील नागरिकांना कृषी सेवकांपर्यत बियाण्याची माहीत देवून स्थानिक शेतकºयांकडचे बियाणे पेरणीसाठी उपलब्ध करु न दिले होते. त्याचप्रमाणे तालुक्यातील ज्यांनी खताची मागणी केली त्यांना कृषी सेवा केंद्रामार्फत बांधावर खते उपलब्ध करून दिली.या वर्षी चांगल्या पावसाला जुन महीन्याच्या पहील्या आठवडयात सुरवात झाल्यामुळे सोयाबीन व भुईमुग पिकाची पेरणी केली परंतू आता दहा बारा दिवसापासुन उन्हाळा सारखा सुर्य आग ओकू लागल्यामुळे लहान कोवळी सोयाबिनचे पिक करपायला लागले होते, त्ते वाचविण्याकरीता विहीरीचे पाणी देत असल्याचे सोयाबिन उत्पादक लक्ष्मण चौधरी यांनी सांगितले.
पावसाने पाठ फिरवल्यामुळे भात लागवडीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 4:18 PM
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात निसर्ग चक्र ीवादळच्या दिवसापासुन पावसाला सुरवात झाल्यापासून ते ७ जुनपर्यत समाधानकारक पाऊस झाला होता. परंतू ...
ठळक मुद्देकृषी सेवा केंद्रामार्फत बांधावर खते उपलब्ध करून दिली.