गणरायाच्या मूर्ती कामासाठी शाडूमातीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:10 PM2020-04-04T22:10:48+5:302020-04-04T22:13:38+5:30
नाशिक : भारतासह संपूर्ण जगावर ओढवलेले कोरोनाचे विघ्न टळू दे, यासाठी विघ्नहर्ता गणरायाला साकडे घातले जात असतानाच येत्या आॅगस्टमध्ये साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तिकामाला मूर्तिकारांनी सुरुवात केली आहे. पण लॉकडाउनमुळे विशेषत: भावनगर गुजरात येथून येणाºया शाडूमातीला तूर्त ब्रेक बसला आहे. त्यामुळे मूर्तिकारांच्याही चिंता वाढल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारतासह संपूर्ण जगावर ओढवलेले कोरोनाचे विघ्न टळू दे, यासाठी विघ्नहर्ता गणरायाला साकडे घातले जात असतानाच येत्या आॅगस्टमध्ये साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तिकामाला मूर्तिकारांनी सुरुवात केली आहे. पण लॉकडाउनमुळे विशेषत: भावनगर गुजरात येथून येणाºया शाडूमातीला तूर्त ब्रेक बसला आहे. त्यामुळे मूर्तिकारांच्याही चिंता वाढल्या आहेत.
यावर्षी २२ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून, १ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला विसर्जन होईल. पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गणपतीमूर्ती तयार करण्याच्या कामाला मूर्तिकारांनी सुरुवात केली आहे. दरवर्षी मूर्तिकार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मूर्तिकामास प्रारंभ करतात. पीओपीच्या मूर्ती बाहेरून येत असल्या तरी नाशिकमध्ये शाडूमातीच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी असते. त्यामुळे शहरातील काही मूर्तिकार शाडूमातीपासून मूर्तिकामाला प्राधान्य देतात. मूर्तीसाठी लागणारी शाडूमाती ही भावनगर, गुजरात येथून आणली जात असते.ेकाही मूर्तिकारांनी मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच आॅर्डर देऊन ठेवल्याने त्यांचा माल नाशकात येऊन पोहोचला आहे; पण बºयाच मूर्तिकारांना अद्याप माल आलेला नाही. साधारणपणे गुढीपाडव्याच्या काही दिवस आधी ट्रान्सपोर्टने माल येऊन पोहोचतो; पण कोरोनामुळे देशभर लॉकडाउन सुरू असल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे माल येणे थांबले आहे. परिणामी मूर्ती कामालाही वेग मंदावला आहे.
कोरोनाचे विघ्न कधी दूर होईल याबाबत अनिश्चितता आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढल्यास त्याचा मोठा परिणाम एकूणच अर्थकारणावर होणार आहे. हा कालावधी लवकर संपला नाही तर मूर्तिकामावरही त्याचा परिणाम होऊन मूर्तीची टंचाई भासण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आमचे कुटुंब गेल्या चार पिढ्यापासून शाडूमातीपासूनच मूर्तिकाम करत आले आहेत. आम्ही डिसेंबरमध्येच आॅर्डर देऊन ठेवल्याने आमच्याकडे पुरेसा माल आहे. लॉक डॉउनमुळे माल येणे थांबला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही त्यामुळे मागणीनुसार मूर्तिकाम सुरू केले आहे. कोरोनाचे हे विघ्न लवकर दूर होवो, ही प्रार्थना. - मयूर मोरे, मूर्तिकार, नाशिक