प्रवाशांअभावी बसच्या चाकांना ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:51 PM2020-05-24T22:51:27+5:302020-05-24T22:51:49+5:30

लॉकडाउनच्या काळात शासनाने बससेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने दोन महिन्यांपासून थबकलेली बसची चाके दि. २२ मेपासून पुन्हा धावू लागली आहेत. या आदेशाने कोरोनामुळे कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन केलेल्या एसटी महामंडळाला व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असताना प्रवाशांअभावी बसच्या चाकांना तिसºयाच दिवशी ब्रेक लागला आहे.

Break the wheels of the bus due to lack of passengers! | प्रवाशांअभावी बसच्या चाकांना ब्रेक!

प्रवाशांअभावी बसच्या चाकांना ब्रेक!

googlenewsNext
ठळक मुद्देदोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वाहतूक सेवा सुरू : पिंपळगाव बसवंत, येवला, पेठ आगारातच एस.टी. उभी

नाशिक : लॉकडाउनच्या काळात शासनाने बससेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने दोन महिन्यांपासून थबकलेली बसची चाके दि. २२ मेपासून पुन्हा धावू लागली आहेत. या आदेशाने कोरोनामुळे कोट्यवधी
रु पयांचा तोटा सहन केलेल्या एसटी महामंडळाला व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असताना प्रवाशांअभावी बसच्या चाकांना तिसºयाच दिवशी ब्रेक लागला आहे.
पिंपळगाव बस आगार
कोरोनामुळे मार्चपासून एसटी महामंडळाची बससेवा बंद होती. लॉकडाउनच्या काळात पिंपळगाव बसवंत आगाराला अंदाजे साडेतीन कोटींचा फटका बसला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे पगारदेखील रखडले आहेत. गेल्या आठवड्यात पिंपळगाव आगाराने ६ हजारांहून अधिक परप्रांतीय बांधवांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठी १५० बसेसची सेवा पुरवली. मात्र, सर्वसामान्यांना वाहतूक सेवा कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा होती. शासनाचे बससेवा सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने निफाड, दिंडोरी, वणीकडे बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र प्रवासीच नसल्याने या बसेस दिवसभर स्थानकात उभ्या असलेल्या बघायला मिळत आहेत.
पिंपळगाव आगारामधून सकाळी ७ वाजता पहिली बस सुटणार असल्याने आगारप्रमुख विजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड, दिंडोरी, वणी या मार्गावर जाणाºया बसेस सॅनिटाईज केल्या गेल्या. प्रवाशांना सुखकर सेवा देण्यासाठी बसेसची देखभाल करून सज्ज ठेवण्यात आल्या; मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकही प्रवासी न आल्याने या बसेस पुन्हा आगारात नेण्यात आल्या.
शासनाच्या सूचनेनुसार बससेवा सुरू झाली आहे. ही सेवा आंतरजिल्हा असून, सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बसेस सुरु राहील. बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार असून, एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशानांच प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील सेवेसंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- विजय निकम, आगारप्रमुख, पिंपळगाव

पेठ आगारातून आठ फेºयांतून ११४ प्रवाशांची वाहतूक
पेठ : कोरोना ग्रीन झोनमध्ये स्थानिक बसवाहतुकीस परवानगी मिळाल्यानंतर पेठ आगारातून शुक्र वारपासून तीन बसेस सोडण्यात आल्या. मात्र प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळाला. शुक्र वारी आठ फेºयांतून ८४, तर शनिवारी ११४ प्रवाशांनी लालपरीचा आधार घेतला. पेठ ते हरसूल हा नेहमीच जास्त प्रवासी असलेल्या मार्गावर बस सोडण्यात आली तसेच पेठ -घुबडसाका व पेठ-जाहुले या दोन बसेस सुरू करण्यात आल्या. सध्याचे लॉकडाउन व त्यामुळे बंद असलेले आठवडे बाजार यामुळे प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याचे आगारप्रमुख स्वप्नील अहिरे यांनी सांगितले.
४ येवला : येथील स्थानकातून सुरू झालेली बससेवा तिसºया दिवशीही प्रवाशांअभावी रद्द झाली. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाबाधित आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन बसेसच्या माध्यमातून सोळा फेºया करण्याचे नियोजन आगाराने केले आहे. येवला-नांदगाव, येवला-लासलगाव, येवला-निफाड, येवला-मनमाड अशा प्रत्येकी दोन म्हणजे एकूण आठ तर येऊन-जाऊन सोळा फेºया करण्याचे नियोजन आहे. मात्र, प्रवासीवर्गाच्या प्रतिसादाअभावी तिसºया दिवशीही या बसफेºया रद्द कराव्या लागल्या आहेत. एसटीची प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली गेली असली तरी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालपरीतून प्रवास करायच्या मन:स्थितीत नागरिक नसल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे बसफेºया वाढविण्यात येतील, असे आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी सांगितले.

लासलगाव आगाराची ‘लालपरी’ रस्त्यावर
लासलगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लासलगाव आगाराची बससेवा बंद होती. शुक्रवारपासून प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून आंतरजिल्हा बससेवेत लासलगाव ते मनमाड, चांदवड आणि सिन्नर या गावांदरम्यान एसटीची लालपरी पुन्हा धावू लागली आहे. नाशिक, मालेगाव व कंटेन्मेंट झोन वगळता ग्रामीण भागात एसटी बस सुरू करण्यात आल्याने लासलगाव बसस्थानकातून सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मनमाडसाठी सकाळी १० वा, दुपारी ४ वाजता एसटी बस सुटणार आहे. चांदवडसाठी सकाळी ७.३० वा, दुपारी १ वाजता, तर सिन्नरसाठी सकाळी ८.३० वा व दुपारी १ वाजता बस सुटणार आहे. या बससेवेदरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग राखत ५० टक्के प्रवासी वाहतूक केली जाणार आहे.

Web Title: Break the wheels of the bus due to lack of passengers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.