कादवा नदीचे कठडे तोडून आयशर टेम्पो नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:18 AM2021-09-14T04:18:40+5:302021-09-14T04:18:40+5:30

निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १७ बीवाय ६२५३) हा पहाटे ...

Breaking the mud river banks into the Eicher Tempo river basin | कादवा नदीचे कठडे तोडून आयशर टेम्पो नदीपात्रात

कादवा नदीचे कठडे तोडून आयशर टेम्पो नदीपात्रात

Next

निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १७ बीवाय ६२५३) हा पहाटे पाचच्या सुमारास नाशिक बाजूकडून निफाड बाजूकडे जात होता. सदर आयशर टेम्पो निफाडच्या कादवा पुलावरून जात असताना पहाटेच्या अंधारात सदर टेम्पोची पुलाच्या लोखंडी कठड्यांना धडक बसून तो कादवा नदीवरील जुन्या आणि नव्या पुलाच्या मधोमध पडला. दोन्ही पुलांच्या मधोमध पडल्याने सदर टेम्पो हळूहळू खाली गेल्याने मोठी दुर्घटना झाली नाही. सदरची घटना निफाड पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर निफाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक सागर घोलप हे करीत आहेत. दुपारी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त आयशर टेम्पो नदीपात्रातून वर काढण्यात आला.

फोटो- १३ कादवा ॲक्सीडेंट

130921\13nsk_47_13092021_13.jpg

   फोटो- १३ कादवा ॲक्सीडेंट 

Web Title: Breaking the mud river banks into the Eicher Tempo river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.