बाळाच्या सुदृढतेसाठी मातेचे दूध ठरते वरदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:30 PM2020-08-01T17:30:10+5:302020-08-01T17:35:04+5:30
आईचे दुध अनेक कारणांसाठी पोषक असते. यात प्रामुख्याने आपल्या बाळाच्या वाढ व विकासासाठी, स्वत:ची झालेली झीज भरून काढण्यासाठी, चांगल्या दर्जाच्या दूध निर्मितीसाठी, रोजच्या कामाच्या ऊर्जेसाठी, बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि चांगल्या विकासासाठी दुध उपआयुक्त ठरते.
आईचे दुध अनेक कारणांसाठी पोषक असते. यात प्रामुख्याने आपल्या बाळाच्या वाढ व विकासासाठी, स्वत:ची झालेली झीज भरून काढण्यासाठी, चांगल्या दर्जाच्या दूध निर्मितीसाठी, रोजच्या कामाच्या ऊर्जेसाठी, बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि चांगल्या विकासासाठी दुध उपआयुक्त ठरते.
जगभरात एक आॅगस्ट ते सात आॅगस्ट हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो या सप्ताहाच्या निमित्ताने स्तनपानाचे बाळाला व आईला होणारे फायदे स्तनपानाचे महत्त्व स्तनपान कशा पद्धतीने करावे इत्यादी गोष्टींवर जनजागृती करण्यात येते परंतु स्तनपान अतिशय चांगल्या पद्धतीने जर बाळाला करावयाचे असेल तर स्तनपान करणार्या आईने स्वत:च्या आहाराची काळजी कशाप्रकारे घ्यावी जेणेकरून आईच्या दुधाचे प्रमाण व दुधाचा दर्जा वाढविण्यासाठी नक्कीच फायदा होईल कारण आईचे स्वास्थ जर चांगले नसेल तर आई आपल्या बाळाला चांगल्या प्रकारे स्तनपान करण्यास असमर्थ ठरते त्यासाठी प्रत्येक स्तनपान करणार्या आईने स्वत:च्या पोषणाची काळजी घेतलीच पाहिजे.
आईचे दुध अनेक कारणांसाठी पोषक असते. यात प्रामुख्याने आपल्या बाळाच्या वाढ व विकासासाठी, स्वत:ची झालेली झीज भरून काढण्यासाठी, चांगल्या दर्जाच्या दूध निर्मितीसाठी, रोजच्या कामाच्या ऊर्जेसाठी, बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि चांगल्या विकासासाठी दुध उपआयुक्त ठरते. आईचे दूध हे अमृत समजले जाते कारण, आईच्या दुधात बाळाच्या वाढ व विकासासाठी लागणारे सर्व पोषक घटक असतात तर अशावेळी जर जर आईच्या स्तनांमध्ये मुबलक प्रमाणात दुधाची निर्मिती होत नसेल तर बाहेर उपाशी राहू शकतो व त्याच्या पोषक तत्वाची गरज देखील पूर्ण होणार नाही. त्यासाठी आईने खालील गोष्टींचे गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे
१ )दिवसभरात पाच ते सहा वेळा पौष्टीक आहार घेणे: आहारात सर्व प्रकारची धान्ये जसे गहू बाजरी ज्वारी नागली तांदूळ इत्यादी सर्व प्रकारच्या धान्यांचे सेवन करणे जेणेकरून सर्व पोषण मूल्य मिळण्यास मदत होईल त्याचप्रमाणे आहारात दूध अंडी डाळी कडधान्य हिरव्या पालेभाज्या फळे इत्यादी प्रतिनियुक्ती पदार्थांचा वापर करावा
२) दिवसभरात भरपूर प्रमाणात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
३) स्तनपान करणाऱ्या मातेने आहारात योग्य प्रमाणात इसेन्शियल फिट सिड्स जसे ओमेगा थ्री ओमेगा सिक्स यांचे सेवन करावे त्यासाठी आहारात जवसाची चटणी तिळाची चटणी भिजवलेले बदाम अक्र ोड इत्यादी पदार्थांचे सेवन करावे
४ ) सुपरफुड्स: रोजच्या आहारात सुपरफुड्स म्हणजेच डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, लाडू खोबरे टाकून नागली शिरा राजिगरा शिरा जिरा ओवा बडीसोप इत्यादी पदार्थांचे सेवन करावे जेणेकरून दुधाचा दर्जा वाढविण्यासाठी मदत मिळेल साखरेऐवजी गुळाचा वापर करावा
५ )स्तनपान करणाºया आईने उग्र वासाच्या भाज्या जसे फ्लॉवर गवार वांगी त्याचप्रमाणे अतिशय तिखट पदार्थ तळलेले पदार्थ जंक फूड कॉल ड्रीम्स चहा व कॉफी यांचे सेवन करू नये
६ ) स्तनपान करणा-या मातेने स्वत:ला मानिसक ताण तणाव यापासून दूर ठेवले पाहिजे व आनंदी वातावरणात बाळाला स्तनपान केले पाहिजे
७) जेवणाच्या वेळा निश्चित असणं आवश्यक आहे.
८ ) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषधे घेऊ नये.
साधारणत: आवश्यक पोषण मूल्याची दैनंदिन गरज लक्षात घेतली तर
कॅलरीज- अतिरिक्त + ६०० कॅलरीज
प्रथिने - अतिरिक्त २५ ग्रॅम
लोह- ३० ग्रॅम
कॅल्शियम अतिरिक्त ६०० मिलिग्रॅम
सर्व सोप्या गोष्टी आईने आपल्या रोजच्या आहारात अमलात आणल्या तर नक्कीच आईचे व बाळाचे पोषण योग्यरीत्या होऊन दोघांचे स्वास्थ निरोगी राहण्यास नक्कीच फायदा होईल.
- रंजीता शर्मा चौबे,
आहार तज्ञ,
विभागीय संदर्भ सेवा रु ग्णालय नाशिक