महामारीत लाचखोरी जोरात; महसूल सर्वात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:48+5:302021-05-29T04:11:48+5:30

नाशिक जिल्ह्यामध्ये २७ सापळे विभागाने यशस्वीरीत्या रचले. यावर्षीही नाशिक विभाग राज्यात लाचखोरीमध्ये सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ...

Bribery rampant in the epidemic; Revenue at the forefront | महामारीत लाचखोरी जोरात; महसूल सर्वात पुढे

महामारीत लाचखोरी जोरात; महसूल सर्वात पुढे

Next

नाशिक जिल्ह्यामध्ये २७ सापळे विभागाने यशस्वीरीत्या रचले. यावर्षीही नाशिक विभाग राज्यात लाचखोरीमध्ये सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मार्च महिन्यापासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव नाशकात वेगाने वाढण्यास सुरुवात झाली. यामुळे शासकीय कामकाजही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही रोडावली. तरीदेखील चालूवर्षी आतापर्यंत नाशिक विभागात ५४ सापळे रचले गेले आणि एकूण ७२ संशयित भ्रष्ट लोकसेवकांच्या हाती पैशांऐवजी बेड्या पडल्या.

मागील वर्षी नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव अशा पाच जिल्ह्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रात एकूण १०० लोकसेवक रंगेहाथ लाच घेताना पकडले गेले होते. यामध्ये सर्वाधिक पोलीस आणि महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये वर्षभरात नऊ लाचखोर पोलिसांसह महसूल खात्याच्या सात कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी लाचखोरीचा टक्का अधिक वाढण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहे.

--इन्फो--

लॉकडाऊन शिथिलतेनंतर भ्रष्टाचारात होते वाढ

नाशिक विभागात वर्षभरात शंभर सापळे यशस्वी ठरले, तर अपसंपदेप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले. या विभागात एकूण १०४ गुन्हे गेल्यावर्षी दाखल झाले. मागीलवर्षी लॉकडाऊन शिथिल होताच शासकीय कार्यालयांमधील कामकाजाची गाडी रुळावर आली आणि काही लोकसेवकांनी भ्रष्टाचाराकडे वळत लाचेची मागणी करत सर्वसामान्यांची अडवणूक केल्याचे दिसून आले होते. यंदाही मागील वर्षाप्रमाणेच सर्वाधिक गुन्हे लॉकडाऊन शिथिलतेनंतर घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिक परिक्षेत्रात दाखल झालेल्या १०४ गुन्ह्यांपैकी ४८ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.

--

--कोट--

मागीलवर्षी तसेच यावर्षीही कोरोनामुळे काहीसा परिणाम भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर झालेला दिसतो; मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत नाशिक विभागातून मोठ्या प्रमाणावर लाचखोरीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ५४ सापळा कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ७२ संशयित लोकसेवकांना अटक करण्यात आली आहे. मागील वर्षी नाशिक विभागाने सापळा कारवाईचे शतक पूर्ण केले होते. राज्यात नाशिकचा भ्रष्टाचारविरोधी कारवाईत गेल्या वर्षी दुसरा क्रमांक लागतो.

- सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

------

--आलेख--

गेल्या वर्षातील विभागनिहाय सापळे असे... महसूल- २६ पोलीस-२४

जिल्हा परिषद-६

पाटबंधारे- ४

महावितरण-७

खासगी व्यक्ती-३

सहकार-३

वनविभाग-२

---आलेख---

वर्षनिहाय कारवाया (नाशिक विभाग)

२०१८- ११५ २०१९- १२३ २०२०- १००

===Photopath===

270521\151127nsk_27_27052021_13.jpg~270521\151227nsk_30_27052021_13.jpg

===Caption===

लाचखोरी जोरात~लाचखोरी डमी फॉरमेट

Web Title: Bribery rampant in the epidemic; Revenue at the forefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.