रिक्षाचालकांच्या मुलीचे उज्ज्वल यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:12 AM2019-06-11T01:12:25+5:302019-06-11T01:12:48+5:30
येथील रिक्षाचालक प्रदीप हिरालाल बिरारी यांची मुलगी संस्कृतीने शालांत परीक्षेत ९३.६० टक्केगुण मिळवित घवघवीत यश संपादन केले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आईला घरातील कामात मदत करून पहाटे लवकर उठून तसेच रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून चांगले गुण मिळविले असल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सिडको : येथील रिक्षाचालक प्रदीप हिरालाल बिरारी यांची मुलगी संस्कृतीने शालांत परीक्षेत ९३.६० टक्केगुण मिळवित घवघवीत यश संपादन केले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आईला घरातील कामात मदत करून पहाटे लवकर उठून तसेच रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून चांगले गुण मिळविले असल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यापुढेही चांगला अभ्यास करून उच्चपदस्थ अधिकारी व्हायचे असल्याचे संस्कृतीने सांगितले.
हिरालाल बिरारी हे मूळचे अंमळनेर, जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून, हल्ली ते सिडकोतील राजरत्ननगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह राहतात. बिरारी यांचा उदरनिर्वाह रिक्षा चालवून होत आहे. मुलगी संस्कृती ही इयत्ता दहावीत सिडको उत्तमनगर येथील जनता विद्यालयात शिक्षण घेतले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने संस्कृती हिने परिस्थितीवर मात करीत आपल्याला दहावीत चांगले गुण मिळावे यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू ठेवले होते. संस्कृती ही आईला घरातील कामाला मदत करून अभ्यास करीत होती. पहाटे लवकर उठून तसेच रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला असल्याचे संस्कृतीने सांगितले. यंदाच्या वर्षी शाळेकडील वीस गुण नसल्याने तसेच अभ्यासक्रमदेखील नवीनच असल्याने वर्षभर सतत अभ्यास केला. यापुढील शिक्षण घेत उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे संस्कृतीचे स्वप्न आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद व शाळेचे मुख्याध्यापक के. जे. सोनवणे, ए. के. आहेर, एस. एस. गवळी, निवृत्ती पवार, गायत्री आहेर यांचे मार्गदर्शन लाभल्याने संस्कृतीने सांगितले.