दारुण पराभवावर बसपाचा उतारा ...म्हणे संघटन करण्यात यशस्वी
By admin | Published: May 17, 2014 12:30 AM2014-05-17T00:30:04+5:302014-05-17T00:40:04+5:30
नाशिक : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहन मायावती यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. सभेनंतर उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये संचारलेल्या उत्साहामुळे बसपा उमेदवाराच्या कामगिरीकडे मतदारांपेक्षा पक्षाचेच अधिक लक्ष होते. परंतु अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करता आल्याने सपशेल पराभव स्वीकारावा लागला असला, तरी संघटन करण्यात यशस्वी झाल्याचे स्पष्टीकरण बसपा पदाधिकार्यांनी दिले. एवढेच काय, विधानसभा निवडणुकीत कामगिरी सुधारण्याकडे भर देणार असल्याचेही स्पष्ट केले.

पराभूत झालेले उमेदवार पराभवाची कारणमीमांसा करण्यात व्यस्त असताना, बसपा मात्र मिळालेल्या जेमतेम मतांवरच खूश असल्याचे समजते. ऐनवेळी बंडखोर उमेदवाराला जाळ्यात ओढण्याचा फार्म्युला यावेळेसदेखील बसपाने कायम ठेवला. कॉँग्रेसचे बंडखोर नगरसेवक दिनकर पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. केवळ भुजबळविरोध समोर ठेवून रिंगणात उतरलेल्या पाटील यांनी विजयाबाबत निश्चिंत असल्याचे वारंवार स्पष्ट केले. परंतु मतदारांचा कौल समोर आल्यानंतर बसपा पदाधिकार्यांनी यावर सावरासावर करीत मतांचा टक्का वाढल्याचे उत्तर दिले. स्थानिक पदाधिकार्यांच्या प्रतिक्रियांमधून पक्ष जरी यशस्वी झाला असला, तरी पाटील यांचा दारुण पराभव झाला हे निश्चित.
आता बसपाला म्हणजेच पाटील यांना विधानसभेचे वेध लागले असून, त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू असल्याचे समजते. जिल्ातील सर्व विधानसभा मतदारसंघांत बसपाचे उमेदवार उभे करून सर्व उमेदवारांच्या प्रचाराची धुरा आपणच सांभाळणार असल्याचे पाटील यांनी याअगोदरच स्पष्ट केले आहे.
सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार
मतांची टक्केवारी वाढवण्यावर सर्वाधिक भर देणार्या बसपाला आत्तापर्यंत राज्यातून एकही खासदार लोकसभेत पाठविता आला नाही. या निवडणुकीतदेखील त्यांनी मतांची टक्केवारी वाढविण्यावरच भर दिल्याचे समजते. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून बसपाला सर्वाधिक मते दिनकर पाटील यांच्या माध्यमातून मिळाली आहेत.