घरोघरी ‘बम बम भोले’चा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:25 AM2021-03-13T04:25:30+5:302021-03-13T04:25:30+5:30
नागरिकांनी कोरोना संकटाचे भान ठेवून यंदा महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते. त्याचप्रमाणे कोणत्याही ...
नागरिकांनी कोरोना संकटाचे भान ठेवून यंदा महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते. त्याचप्रमाणे कोणत्याही धार्मिक स्थळी तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी संबंधित संस्थांनी काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील गोदाघाटावरील नारोशंकर, नीळकंठेश्वर, पंचवटीतील कापालेश्वर, नारोशंकर, अर्धनारी नटेश्वर, मनकामनीश्वर, घारपुरे घाटावरील सिद्धेश्वर, सराफ बाजारातील तीळभांडेश्वर, गंगापूर रोडचे सोमेश्वर या प्रमुख मंदिरांसह सातपूर, सिडको, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड परिसरातील भगवान शंकरांची मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविकांनी मंदिराबाहेरूनच कलशदर्शन केले; तर अनेकांनी कुटुंबासंमवेत घरोघरी भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा करून ‘बम बम भोले’चा जयघोष केला.
इन्फो-
रामकुंड परिरात पोलीस बंदोबस्त
कोरोनामुळे शहरातील भगवान शंकरांची मंदिरे बंद असल्याने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात पवित्र स्नानासाठी नाशिककर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तरी या भागात भाविकांनी गर्दी केल्याने पोलिसांसमोर गर्दी नियंत्रित करण्याचे आव्हान निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी सक्तीने भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविले.
===Photopath===
110321\11nsk_10_11032021_13.jpg
===Caption===
गोदाघाटावर भगवान शंकराची पूजा करताना महिला भाविक