राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी संतोष भाबड यांच्या शेतातील मक्याच्या चाऱ्याला शर्टसर्किटमुळे अचानक आग लागली, त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे.सात एकर क्षेत्रात असलेला मकाचा चारा १४ ट्रॉली चारा आगीत भस्मसात झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे. जनावरांना खाण्यासाठी चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. भाबड यांनी येवला येथील येथील अग्निशामक दलास कळविताच घटनास्थळी बंब येईपर्यंत संपूर्ण चारा जळून खाक झाला होता. जवळपास असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी जळणाऱ्या चाऱ्याशेजारी असलेली मक्याची कणसे, बिट्या दूर केल्या. व आग विझविण्याचा प्रयत्न केला.शेतातील शेततळ्याच्या पाण्यामुळे मक्याच्या बिट्या आगीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी मेहनत घेतली. मात्र चारा संपूर्ण जळुन खाक झाला आहे. आगीचे तांडव जास्त प्रमाणात असल्याने चारा हा ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.दरम्यान शॉर्टसर्किट झाल्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला होता व शेततळ्यावर असलेले इंजिनच्या साहाय्याने पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पोलवर असलेल्या वीज वाहिनीवरील झेम तुटल्याने तेथील आगीचा लोळ खाली चाऱ्यावर पडल्याने आगीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला. अग्निशामक बंब येण्यास थोडा उशीर झाला व टँकरमधील पाणी संपून गेल्यानंतर शेततळ्याचे पाणी हे पिटर इंजिनच्या साहाय्याने पाणी अग्निशामक बंबात टाकून कमीत कमी दोन तासाच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे शेजारी असलेल्या मक्याचे काही प्रमाणात नुकसान टळले आहे.राजापूरचे तलाठी ज्ञानेश्वर रोखले, कोतवाल अरुण जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्ष्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजापूर व परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा या लोंबकळत दिसत आहे. राजापूर येथे जागेवर वायरमेन राहत नसल्याने व वायरमन हे बाहेरगावी राहत असल्याने जागेवर कोणी नाही राहत नाही . बराच वेळा वायरमन अभावी विजची कामे खोळंबली जातात.(१७ राजापूर, १)
शॉर्टसर्किटने चारा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 6:25 PM
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी संतोष भाबड यांच्या शेतातील मक्याच्या चाऱ्याला शर्टसर्किटमुळे अचानक आग लागली, त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे.
ठळक मुद्देराजापूर येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान