रस्ते झाडून स्वच्छ केल्यानंतर जमा होणारा कचरा हा पेटविला जाऊ नये, तर तो गोळा करून तत्काळ लहान कचरा संकलन हातगाडीत टाकून घ्यावा असे स्पष्ट आदेश असतानाही काही कर्मचारी बेजबाबदारपणे वर्तन करत कचरा पेटवीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे ‘हरित नाशिक, स्वच्छ नाशिक’ असे बिरुद मिरविणाऱ्या महापालिका प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेच्या नावाखाली झाडांना धोका पोहोचविला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रविशंकर मार्गावर स्वच्छता करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी गोळा केलेला कचरा रस्त्याकडेला पेटविला. यामुळे लागलेल्या आगीच्या ज्वालांनी झाडांनाही बाधा निर्माण झाली. ही छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
कचरा पेटविल्याने येथील जुन्या बाभळीच्या वृक्षांचे बुंधे जळून गेले, तसेच काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या रोपट्यांची चांगली वाढ होऊन त्याचे झाडात रूपांतर होत असताना या आगीने त्यांचाही बळी घेतला. तसेच काही नारळाच्या झाडांचेही बुंधे या आगीमुळे बाधित झाले आहेत. स्वच्छता करणाऱ्या खासगी ठेकेदारांच्याही कर्मचाऱ्यांनाही कचरा न पेटविण्याचे आदेश देण्याची गरज आहे.
--
फोटो आरवर २७ट्री१/२
===Photopath===
270321\27nsk_49_27032021_13.jpg
===Caption===
झाडांचा जळालेला बुंधा